मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune crime : गांजा विक्री करणाऱ्या सासू-सुनेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune crime : गांजा विक्री करणाऱ्या सासू-सुनेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 05, 2022 05:35 PM IST

Pune crime news : पुण्यात गांजा विक्री करणाऱ्या सासू-सुनेच्या जोडीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून गांजा तस्करीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पुणे क्राईम
पुणे क्राईम (HT_PRINT)

पुणे: गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सासु-सुनेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पुणे पोलोसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने ही कारवाई केली. त्यांच्याकडून ४ लाख १३ हजारांचा २० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई लोणी काळभोर परिसरातील सोरतापवाडी चोरघे वस्तीनजीक करण्यात आली.

अमली पदार्थ विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सोरतापवाडी परिसरात दोन महिला डोक्यावर पिशवी घेउन चालत होत्या. या पथकाला या महिलांचा संशय आल्यामुळे त्यांनी दोघींना थांबवून घेत त्याच्या जवळील पिशव्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे तब्बल २० किलो ६०० ग्रॅम गांजा आढळून आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, सहायक निरीक्षक शैलेजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारूती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्वेâ, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नीतेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली.

अमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड म्हणाले, रेल्वेतून प्रवास करीत तस्करीसाठी गांजा घेउन आलेल्या सासु-सुनेला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २० किलो ६०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून आणखी तपास सुरू आहे.

गांजाची वाहतूक करणार्‍या दोघांना अटक, २२ किलो गांजा जप्त

हडपसर परिसरात गांजाची वाहतूक करणार्‍या महिलेलस दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्यांच्याकडून २१ किलो ६९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दोघांकडून सव्वा चार लाखांचा गांजा, तीन मोबाइल, मोटार असा १० लाख ६४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अक्षय भिमा गाडे (वय २५ रा-शिवाजी नगर, नालेगाव, ता. जि. अहमदनगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

हडपसर परिसरात महिलेसह दोघेजण गांजा वाहतूक करणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून मोटारीतून चाललेल्या दोघांना थांबवले. त्यांच्या मोटारीत २१ किलोवर गांजा आढळून आला.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग