मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: पुण्यात फसवणुकीचे सत्र काही थांबेना; व्यावसायिकाला घातला दीड कोटी रुपयांचा गंडा
Pune crime
Pune crime (HT_PRINT)

Pune: पुण्यात फसवणुकीचे सत्र काही थांबेना; व्यावसायिकाला घातला दीड कोटी रुपयांचा गंडा

24 November 2022, 15:40 ISTNinad Vijayrao Deshmukh

Pune Crime news: पुण्यात फसवणुकीच्या घटना या दिवसेंदिवस वाढल्या आहेत. एका व्यावसायिकाला गुणवणुकीच्या बहाण्याने तब्बल दीड कोटीचा गंडा घातला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : नामांकित कंपनीस गुंतवणुकदार देतो असे सांगत सर्विस चार्जेस करिता व्यवसायिकाकडून १ कोटी ८२ लाख रुपये घेऊन त्यास गुंतवणुकदार न देता काही रक्कम परत करुन सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यवसायिकाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महेंद्र खांदवे (रा.सेनापती बापट रोड, पुणे) असे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत आरोपी विरोधात पोलीसांकडे राजेश ईश्वरलाल मेहता (वय ६१, रा.बाणेर, पुणे) यांनी तक्रार दिली. हा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते आज पर्यंत घडला. तक्रारदार राजेश महेता हे आरोरा इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक असून आरोपी महेंद्र खांदवे हे एमआयएमएस ग्लोबल लिमिटेड कंपनीचे मालक आहेत. खांदवे यांनी आरोरा इनोव्हेशन प्रा.लि. कंपनीत गुंतवणुकदार देतो, असे राजेश महेता यांना बोलून सर्व्हिस चार्जेसकरिता एकूण १ कोटी ८२ लाख रुपये घेतले.

मात्र, त्यांनी कोणतेही गुंतवणुकदार न दिल्याने तक्रारदार यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या पैशाची मागणी केली. त्यावेळी आरोपीने १ कोटी ८२ लाख रुपयांपैकी २९ लाख ८ हजार रुपये परत केले. परंतु उर्वरित रक्कम वारंवार मागूनही त्याची परतफेड न करता तसेच कोणतेही गुंतवणुकदार न देता तक्रारदार यांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस कोळी पुढील तपास करत आहे.

विभाग