पत्नीचे तसले फोटो पाहून बिहारचा शिक्षक पुण्यात आला अन् पत्नीच्या प्रियकराचा झोपेतच चिरला गळा-pune crime teacher husband kills wife boyfriend after her photo viral on social media incident in bavdhan ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पत्नीचे तसले फोटो पाहून बिहारचा शिक्षक पुण्यात आला अन् पत्नीच्या प्रियकराचा झोपेतच चिरला गळा

पत्नीचे तसले फोटो पाहून बिहारचा शिक्षक पुण्यात आला अन् पत्नीच्या प्रियकराचा झोपेतच चिरला गळा

Sep 19, 2024 12:01 AM IST

pune Crime : पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो व्हायरल झाल्याने पतीचा राग अनावर झाला व त्याने पत्नीच्या प्रियकराची गळा चिरून हत्या केली. ही खळबळजनक घटना पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधनमध्ये घडली आहे.

बिहारच्या शिक्षकाने पुण्यात येऊन पत्नीच्या प्रियकराला संपवलं.
बिहारच्या शिक्षकाने पुण्यात येऊन पत्नीच्या प्रियकराला संपवलं.

चारित्र्याच्या संशयातून अनेक संसाराची वाट लागल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. एका दाम्पत्याची गेल्या तीन वर्षापासून घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरू आहे. दरम्यान पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो व्हायरल झाल्याने पतीचा राग अनावर झाला व त्याने पत्नीच्या प्रियकराची गळा चिरून हत्या केली. ही खळबळजनक घटना पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधनमध्ये घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राजीव कुमार याच्यासह त्याचा साथीदार धीरजकुमार रमोदसिंह याला अटक केली आहे. आरोपीराजीव कुमार हा बिहारमध्ये सरकारी शाळेत शिक्षक आहे. त्याने तेथेच काम करणाऱ्या आपल्या मित्राला सोबत घेऊन पुणे गाठलं. पुण्यात आल्यावर त्याने पत्नीचा बॉयफ्रेंड प्रवीण कुमार महतो याचा पत्ता काढला. त्यानंतर झोपेत असतानाच त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली.

मृत प्रवीण कुमार हा पुण्यातील बावधनमध्ये त्याच्या भावाच्या नर्सरीत काम करत होता. दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये ही नर्सरी सुरू केली होती. आरोपी राजीव कुमारने याने मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवीण कुमारच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. मात्र मुंबईकडे जात असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजीव कुमार व त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू आहेत. दोघे गेल्या तीन वर्षापासून विभक्त रहात असून त्यांची घटस्फोटासाठी कोर्टात केसही सुरू आहे. त्यातच पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत फोटो व्हायरल होऊन त्याच्यापर्यंत पोहोचले. यामुळे त्याने पत्नीच्या प्रियकराचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

राजीव कुमार कौटुंबिक कलहमुळे तणावात होता. पत्नी गेल्या तीन- चार वर्षांपासून सोबत राहत नव्हती. तिचे दुसऱ्या तरुणावर प्रेम असल्याने पत्नी आपल्याला सोडत असल्याचा त्याचा समज झाला. यामुळे त्याने प्रवीण कुमारची हत्या केली. हत्या करून मुंबईच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी त्याला पकडले.

Whats_app_banner
विभाग