स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची चौकशी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची चौकशी

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची चौकशी

Ninad Deshmukh HT Marathi
Updated Feb 27, 2025 11:08 AM IST

Pune crime news: पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत मंगळवारी पहाटे २६ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला. आरोपी दत्तात्रय गाडे याने तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेला ४८ तास उलटून देखील आरोपी अद्याप फरार आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची चौकशी
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची चौकशी

Pune Swargate bus depot crime: पुण्यातील सर्वाधिक गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेतील आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे असे आरोपीचे नाव असून या घटनेला ४८ तास उलटून देखील आरोपी गाडे याने पोलिसांना गुंगारा दिला आहे.

 पुणे स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात महिलांवरील वस्त्या अत्याचारामुळे महिलांसाठी पुणे खरच सुरक्षित आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आरोपी दत्ता गाडेचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाही.

आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो प्रचारात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, आरोपी हा राजकीय व्यक्ती, पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या अनुषंगानेही चौकशी सुरू केली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत. कालपर्यंत पुणे पोलिसांची ८ पथके दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होती. मात्र, आता या पथकांची संख्या १३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. दत्तात्रय गाडे लपण्यासाठी कुठे जाऊन शकतो, या सर्व शक्यता विचारात घेऊन पुणे पोलिस त्याच शोध घेत आहेत.

दत्ता गाडेच्या मैत्रिणीची पोलिसांनी केली चौकशी

गुन्हे शाखेने बुधवारी दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरुन चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. दत्तात्रय गाडे याने अनेक तरुणींना त्रास दिल्याचे समोर आले आहे.. चौकशी सुरू असलेल्या तरुणीला देखील गाडे याने त्रास दिला आहे. तो तिला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करुन दे किंवा तिची भेट घालून दे, असा धोशा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावला होता, असे तरुणीने चौकशीत सांगितले. दत्ता गाडे याने आणखी किती महिलांना त्रास दिला याचा देखील पोलिस तपास करत आहेत. गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेच्या शिरूर येथील घरावर देखिलनकर ठेवली जात आहे. आरोपीच्या आईची पत्नीची आणि भावाची देखील पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे.

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा बलात्कार

दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे स्वारगेट डेपोच्या आवारात उभ्या असणाऱ्या तरुणीला भुलवून एका शिवशाही बसमध्ये नेले. ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे याने बसचेदार बंद करुन घेतले आणि तिच्यावर अत्याचार केले होते. दत्तात्रय गाडे याने एकवेळा नव्हे तर दोनवेळा तरुणीवर बलात्कार केला. ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. पीडित तरुणी ही पुण्यात परिचारिका म्हणून काम करत असून ती मंगळवारी फलटणमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती.

 

Ninad Deshmukh

TwittereMail

"निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे. "

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर