मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : धक्कादायक! पुण्यात बाणेर येथे कुत्र्याला दगड मारल्याच्या रागातून इसमावर कुऱ्हाडीने वार

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात बाणेर येथे कुत्र्याला दगड मारल्याच्या रागातून इसमावर कुऱ्हाडीने वार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 05, 2022 02:16 PM IST

Pune Crime news : पुण्यात किरकोळ कारणावरून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना पुण्यातील बाणेर परिसरात उघडकीस आली आहे. पाळीव कुत्र्याला दगड मारल्याच्या कारणावरून एकावर कुऱ्हाडीने वार करत गंभीर जखमी केले आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : कुत्रे अंगावर भुंकत असल्याने त्यास दगड मारल्याने एका तरुणाने ४० वर्षीय इसमाच्या तोंडावर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बाणेर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

रवि त्रिंबक घोरपडे (वय ४०,रा.बाणेर रोड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुब बाशा शेख (वय ३४, रा.पुणे) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा सोलापूर येथील रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ३ डिसेंबर रोजी रात्री बाणेर परिसरात शिंदेमळा येथे घडली. फिर्यादी रवी घोरपडे आणि आरोपी आयूब शेख हे परिचित आहेत. तक्रारदार घोरपडे तीन डिसेंबर रोजी रात्री घरी जात असताना त्यांच्या अंगावर कुत्रे भुंकत होते. त्यामुळे त्यांनी कुत्र्यास हाकलून लावण्यासाठी कुत्र्यांना दगड मारला. त्यावेळी आरोपी आयुब शेख याने कुत्र्यांना दगड का मारतो असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने शेख हा घोरपडे यांच्या घरी गेला. कुत्र्यांना दगड मारला याचा जाब विचारात रागाच्या भरात त्याने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने घोरपडे यांच्या तोंडवावर वार केला. यात घोरपडे हे गंभीर जखमी झाले. यानंतर आरोपी हा शिवीगाळ करत फरार झाला. याप्रकरणी पुढील तपास चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस झरेकर करत आहे.

अल्पवयीन मुलीस तरुणाने केले गरोदर

पुण्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस १८ वर्षीय तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारिरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले. आरोपीने मे २०२२ ते जुलै २०२२ यादरम्याने त्याच्या राहत्या घरी मुलीस बोलवून घेत तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पिडित मुलीच्या ४५ वर्षीय आजीने लोणीकंद पोस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीसांनी सचिन बबन माळी (वय १८) याला अटक केली आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या