मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भर रस्त्यात गाड्या लावून तलवारीने केक कापून साजरा केला ‘भाई का बर्थ डे’; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भर रस्त्यात गाड्या लावून तलवारीने केक कापून साजरा केला ‘भाई का बर्थ डे’; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Jan 13, 2024 12:22 AM IST

Pune janwadi crime: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात जेलमध्ये असलेल्या एका भाईच्या बर्थडे भर रस्त्यात तलवारीने केक कापून साजरा करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Pune janwadi criminal birth day celebration crime
Pune janwadi criminal birth day celebration crime

Pune janwadi criminal birth day celebration crime : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिसांनी वारंवार कारवाई करून देखील या घटना कमी होतांना दिसत नाही. तरुणांमध्ये भाईगिरीची फॅड वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना पुण्यातील जनवाडी परिसरात उघडकीस आली आहे. येथे येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या एका भाईचा बर्थडे काही तरुणांनी रस्त्यात गाड्या लावून तलवारीने केक कापून साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारत जेल मध्ये असलेल्या या भाईच्या पंटरांना बेड्या ठोकत त्यांची धिंड काढली. तलवार उगारून दहशत माजविणारे पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात काही अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Atal Setu Bridge : किती मजबूत अटल ब्रीज? आयफेल टॉवरच्या १७ पट अधिक स्टील आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून ६ पट अधिक काँक्रीट

जनवाडी भागातील गुंड शुभम प्रदीप शिरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या येरवडा कारागृहात आहे. दरम्यान, शिरकर याचा वाढदिवस जनवाडीतील मंजू मित्र मंडळाजवळ अल्पवयीन मुले, तसेच साथीदारांनी भर रस्त्यात साजरा केला. गुंड शुभमचे छायाचित्र असलेला केक आणून भर रस्त्यात गाड्या लावून अकट करण्यात आलेल्या पाच जणांनी तलवारीने केक कापून साजरा केला. यावेळी तलवारी हवेत फिरवून दहशत माजवण्याचा देखील प्रयत्न केला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला.

हा व्हिडिओ पोलिसांपर्यन्त देखील पोहचला. पोलिस यानंतर अॅक्शनमोड मध्ये येत त्यांनी केक कापणाऱ्या पाच आरोपींना ताब्यात घेतले. तसेच आणखी सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला. यानंतर सर्व आरोपींची भर रस्त्यातून वाजत गाजत धिंड काढण्यात आली. पुण्यात तलवार, कोयत्याने केक कापण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे तरुण दहशतीचे वातावरण पसरवत आहे. या वर कारवाईची मागणी नागरीक करत आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग