पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ८५ वर्षांच्या महिलेवर २३ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा हादरलं आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून आरोपींनी मुलीला भेटायला बोलावले होते. त्यावेळी चौघांनी तिच्यावर अत्याचार केला.
मिळालेल्या माहितीनुसार पीडिता पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे पीडित तरुणीवर गेल्या चार महिन्यापासून तरुणीसोबत हा प्रकार सुरू होता. चार आरोपी एकमेकांना ओळखत नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या वेळी तरुणीला बोलावून तिच्यावर अत्याचार केले. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती. याच्या माध्यमातून तिची आरोपी तरुणांशी मैत्री झाली. त्यातील एकाने तिला महाविद्यालयात भेटायला जाऊन तेथेच तिच्यावर अत्याचार केले.
दुसऱ्या आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. अन्य दोन आरोपींनीही तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबतची माहिती पीडितेने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या होत्या. तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या 'गुड टच बॅड टच' अभियानात असलेल्या समुपदेशक तिने आपल्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला.
हा प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तत्काळ कारवाई सूरू करत संबंधितांवर गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
पुणे जिल्ह्यातील हातवे खुर्द येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गुंजवणी नदीच्या एका पुला शेजारी आढळलेल्या एका मृत व्यक्तीच्या खुनाचा छडा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने लावला आहे. करणी केल्याच्या संशयातून एका इस्टेट एजंटने पुजाऱ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे.