मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hinjewadi murder : पुण्यात सॉफ्टवर इंजिनीअर तरुणीची गोळ्या घालून हत्या. मारेकरी निघाला…

Hinjewadi murder : पुण्यात सॉफ्टवर इंजिनीअर तरुणीची गोळ्या घालून हत्या. मारेकरी निघाला…

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 29, 2024 01:03 PM IST

Pune Hinjewadi murder techie Murder News : प्रियकराने आपल्या प्रेसयीची हॉटेलमध्ये गोळ्या घालून हत्या केली. ही घटना पुण्यातील हिंजवडीमध्ये घडली.

Pune crime news
Pune crime news

Hinjewadi murder techie Murder News : प्रेमप्रकरणातून एका तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. मृत तरुणी इंजिनीयर असून तिच्या प्रियकरानेच तिला संपवले आहे. आयटी नगरी हिंजवडी मध्ये एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. प्रेयसीची हत्या करुन पुण्यात पलायन करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

वंदना दिवेदी असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ निकम याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  आयटी नगरी हिंजवडीमध्ये एका हॉटेलमध्ये ऋषभने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून तिची गोळ्या घालून हत्या केली. वृषभ आणि वंदना हे दोघेही मूळचे लखनऊचे असून दोघे मागील काही दिवसांपासून हिंजवडी मधील एका हॉटेलमध्ये राहत होते. 

रविवारी सकाळी वंदनाची हत्या केली. प्रेयसीची हत्या करून ऋषभ हॉटेलमधून पळून जाताना तेथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दरम्यान मुंबई पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये तो पिस्तूलसह सापडल्याने त्याला अटक केली आहे. हत्येच्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.

पती-पत्नी आणि मुलाची आत्महत्या

मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेरमध्ये संपूर्ण कुटूंबाने आपले जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आई-वडील व मुलाने एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सिरोल पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. येथे एका घरात राहणाऱ्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत मिळाले. या कुटूंबात तीन जण रहात होते. शंका उपस्थित करण्यात येत आहे की, तीन जणांनी एकाच वेळी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या कुटूंबाने आपले जीवन का संपवले, याचा खुलासा घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटवरून झाला आहे.

WhatsApp channel

विभाग