पुण्यात महिलांवर अत्याचार सुरूच! बाणेर येथील बड्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात महिलांवर अत्याचार सुरूच! बाणेर येथील बड्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

पुण्यात महिलांवर अत्याचार सुरूच! बाणेर येथील बड्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

Oct 07, 2024 06:35 AM IST

Pune Baner rape case : पुण्यात बाणेर येथे एका रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर एका पर्यवेक्षकाने बलात्कार केल्याचे उघड झाले असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात महिलांवर अत्याचार सुरूच! बानेर येथील बड्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक
पुण्यात महिलांवर अत्याचार सुरूच! बानेर येथील बड्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

Pune Baner rape case : पुण्यात महिला असुरक्षित असल्याचं गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गोष्टीवरून सिद्ध झाले आहे. सलग तीन दिवसांपासून महिला अत्याचारांच्या घटना समोर येत आहे. वानवडी येथील स्कूल बसमध्ये दोन मुलींवर अत्याचार झाले होते. त्यानंतर खराडी येथील शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाले होते. तर बोपदेव घाटात एका मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटना ताज्या असतांना आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे.

बाणेर येथील एका मोठ्या रुग्णालयात सफाई कामगार असलेल्या महिलेवर पर्यवेक्षकाने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही बाणेर भागातील एका नामांकित रुग्णालयातील सफाई कर्मचारी म्हणून काम करते. या महिलेवर पर्यवेक्षकाने बलात्कार केला. या प्रकरणी महिलेने रुग्णालयातील सुरक्षा अधिकाऱ्याकडे या बाबत तक्रार दिली होती. मात्र, त्यांनी हे प्रकरण दाबून टाकले. यामुळे पीडित महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित महिला ही एका खासगी संस्थेकडून रुग्णलायात सफाई कर्मचारी म्हणून गेल्या चार वर्षांपासून रुग्णालयात काम करत आहे. ही महिला २९ जून रोजी कामावर आली. दुपारी काम झाल्यावर ती तिसऱ्या मजल्यावर गेली. यावेळी आरोपी बेनगुडे याने महिलेला पाहिले. त्याने क्ष-किरण विभागात धूळ असून ती साफ करण्यास महिलेला सांगितले. दरम्यान, त्याने सांगितल्या नुसार महिला ही सफाई करत असतांना आरोपी बेनगुडे तेथे आला.

यावेळी त्याने महिलेला धमकावले व तिच्यावर तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केला. या सोबतच या बाबत कुणाला काही सांगितल्यास कामावरुन काढून टाकण्याची धमकी देखील त्याने दिली. दरम्यान, महिला ही घरी गेली. तिने या बाबत कुणाला काही सांगितले नाही. यानंतर तिने रुग्णलायातील सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्याकडे आरोपी विरोधात तक्रार केली, मात्र, पीडितेने दिलेल्या अर्जाची दखल घेण्यात आली नाही. अखेर महिलेने हिंमत दाखवत आरोपी विरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल आरोपीला अटक केली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर