मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Mohol Wife : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याची धमकी

Sharad Mohol Wife : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याची धमकी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 05, 2024 10:59 PM IST

Sharad Mohol Death Threats : शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Sharad Mohol Death Threats
Sharad Mohol Death Threats

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नीस्वाती मोहोळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही धमकी देण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकीदिली आहे. याआधीही स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

कुख्यात गुंडशरद मोहोळ याची यावर्षी ५ जानेवारी रोजी त्याच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशीच त्याच्या साथीदारांनी त्याची हत्या केली होती. मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत त्यांना धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ काही दिवसांपूर्वीच माध्यमांसमोर आली होती. त्यावेळी तिने गणेश मारणे याच्यापासून जीवाला धोका असल्याचा दावा केला होता.स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

पुणे पोलिसांनी संगमनेर येथून गणेश मारणे याला अटक केली होती. पोलिस आल्याचं कळताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी थरारक पाठलाग करत त्याला अटक केली होती. गणेश मारणे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

WhatsApp channel