Pune Police raid : उरुळी कांचनमध्ये पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ९००० लिटर गावठी दारू जप्त
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Police raid : उरुळी कांचनमध्ये पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ९००० लिटर गावठी दारू जप्त

Pune Police raid : उरुळी कांचनमध्ये पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ९००० लिटर गावठी दारू जप्त

Updated Feb 27, 2024 11:04 AM IST

Pune police seized liquor at Uruli Kanchan : पुण्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. तब्बल ३ हजार ५०० कोटीचे ड्रग्स पडल्यानंतर आता अवैध मध्य तयार करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Pune Crime News :
Pune Crime News :

Pune police seized liquor at Uruli Kanchan : पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस अॅक्टिव झाले आहे. आधी गुन्हेगारांची ओळख परेड नंतर आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश करत तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केल्यावर अवैध दारू तस्करांवर पोलिसांनी फास आवळला आहे. पुण्यातील ऊरुळी कांचन परिसरात अवैध दारू तयार करणाऱ्यांवर मध्यरात्री कारवाई करत तब्बल ९ हजार लीटर दारू नष्ट करण्यात आली तर दारू तयार करण्याचे साहित्य आणि रसायने जप्त करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

डॉक्टर आनंदीबाई जोशी स्मृतिदिनी अभिवादन करताना अभिनेत्रीचा फोटो लावल्याने नारायण राणे झाले ट्रोल

पुणे शहराजवळ सोरतापवाडी येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती आणि विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी रात्री या हातभट्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तब्बल ९ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त जप्त करत नष्ट करण्यात आली आहे. ऊरुळी कांचन येथे सोरतापवाडी परिसरात पोलिसांनी २ वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. पहिल्या कारवाईत ५२५ लिटर दारू नष्ट करण्यात आली तर दुसऱ्या कारवाईत तब्बल ९ हजार लिटर हातभट्टी दारूचे कंटेनर नष्ट करण्यात आले. तर दारू तयार करण्यासाठी लागणारे ५ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आले आहे.

Gokhale Bridge : मुंबईतील गोखले पुलाची एक मार्गिका अखेर खुली; मात्र 'या' वाहनांना पुलावर बंदी

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार सोरतापवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने देखील जिल्ह्यात ६ ठिकाणी छापे टाकत ९९५ हजार लीटर गावठी हातभट्टी दारूसह ७ लाख ९० हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १३ व १४ फेब्रुवारी रोजी सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी आंबळे येथे करण्यात आली होती.

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे कोयता गँग नंतर पुण्यात अवैध धंदे देखील वाढले आहेत. ड्रग्स प्रकरणामुळे पुण्यात मोठे रॅकेट सुरू असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या विरोधात आता पुणे पोलिसांनी कंबर कसली असून मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर