मॅट्रिमोनी साईटवरून ओढलं जाळ्यात, १० लाख घेऊन लग्नास दिला नकार; धक्का बसल्यानं पुण्यात महिला डॉक्टरची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मॅट्रिमोनी साईटवरून ओढलं जाळ्यात, १० लाख घेऊन लग्नास दिला नकार; धक्का बसल्यानं पुण्यात महिला डॉक्टरची आत्महत्या

मॅट्रिमोनी साईटवरून ओढलं जाळ्यात, १० लाख घेऊन लग्नास दिला नकार; धक्का बसल्यानं पुण्यात महिला डॉक्टरची आत्महत्या

Jan 20, 2025 11:40 AM IST

Pune Crime news : पुण्यात एका तरुणीची मॅट्रिमोनी वेबसाईट वरून फसवणूक करण्यात आली आहे. हा धक्का सहन न झाल्याने तरुणीने आत्महत्या केली आहे.

मॅट्रिमोनी वेबसाईटवरून तरुणीला ओढलं जाळ्यात, १० लाख घेऊन लग्नास दिला नकार; पुण्यात महिला डॉक्टरनं संपवलं जिवन
मॅट्रिमोनी वेबसाईटवरून तरुणीला ओढलं जाळ्यात, १० लाख घेऊन लग्नास दिला नकार; पुण्यात महिला डॉक्टरनं संपवलं जिवन

Pune Crime news : पुण्यात मॅट्रिमोनी वेबसाईटवरून एका तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम साईटवरून अविवाहित असल्याचं भासवत डॉक्टर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या कडून १० लाख रुपये घेत लुबडल्याचे पुढे आले आहे. या तरुणीला हा धक्का सहन न झाल्याने तिने विष प्राशन करून जिवन संपवलं आहे. या प्रकरणी पुण्यातील बिबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. तर कुलदीप आदिनाथ सावंत असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

आरोपी कुलदीप सांवत यांचे लग्न झाले आहे. मात्र, असे असतांना देखील त्याने जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याची खोटी प्रोफाइल तयार करत पल्लवी फडतरे या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं. पल्लवीने कुलदीप सावंतशी संपर्क साधत प्रोफाइल मॅच केले. येथून त्यांची मैत्री झाली. यानंतर कुलदीपने पल्लवीला लग्नाचे आमिष दाखवलं. तिचा विश्वास संपादन करत विविध कारणाने त्याने तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. यानंतर पल्लवीने त्याच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला. यावेळी कुलदीप पवारने त्याचं लग्न झाल्याच सांगून त्याची पत्नी गर्भवती असल्याचं सांगत पल्लवीला लग्न करण्यास नकार दिला.

पल्लवीला बसला मोठा धक्का

कुलदीप सावंतने लग्न झाल्याचे सांगताच पल्लवीला मोठा धक्का बसला. तिला मोठा मानसिक आघात बसला. ती हा धक्का पचवू शकली नाही. तिने तिच्या क्लिनिकमध्येच विषारी औषध घेत आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यावर पल्लवीच्या कुटुंबीयांनी आरोपी सावंत विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीजवळ असणारे लपटॉपही पोलिसांनी जप्त केले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मॅट्रिमोनियल साईटवरील प्रोफाइलवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून मोठ्या प्रमाणात फसवणूक

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून ओळख वाढवून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे प्रकार रोज उघडकीस येत आहे. यात लग्नाचं आमिष दाखवून विश्वास संपादन करून पैसे घेतले जात आहे. त्यामुळे अशा मॅट्रिमोनिअल साईट्सवरून लग्नस्थळ शोधत असतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर