मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  gangster sharad mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

gangster sharad mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 05, 2024 05:12 PM IST

Sharad Mohol Murder News : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना कोथरुडमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

गँगस्टर शरद मोहोळ
गँगस्टर शरद मोहोळ

पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुक्रवारी भरदुपारी कोथरुडमध्ये घडलेल्या या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण आहे. मोहोळ याच्यावर गोळीबार करून आरोपी दुचाकीवरून पसार झाले असून कोथरून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 

गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोणी हल्ला केला ? गँगवॉरमधून ही घटना घडली का? याचा पोलीस तपास करत आहेत. 

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणसारखे अनेक गुन्हे नोंद आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात जामीन मिलाल्यानंतर दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरण प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. जुलै २०२२ मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. 

WhatsApp channel