मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rape : पुण्यात अल्पवयीन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन केले ब्लॅकमेल

Pune Rape : पुण्यात अल्पवयीन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन केले ब्लॅकमेल

Jun 10, 2024 10:17 AM IST

Pune Crime: पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणीवर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणीवर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणीवर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील परगाव कारखाना येथील एका गावात दोन अल्पवयीन मावस बहीणींवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मुलींचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल देखील केले आहे. या प्रकरणी मुलींच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यावर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vikhroli News:डब्बा द्यायला आलेल्या चिमुकल्याला वडिलांनी थांबवून घेतलं, स्लॅब कोसळून बाप-लेकाचा मृत्यू; व्रिकोळीतील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोऱ्हाडे, महेश तांबे व दोन अल्पवयीन मुले अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण ५ जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली. पारगाव कारखाना येथे एका गावात दोन अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणी घरात एकट्या होत्या. यावेळी आरोपी अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोऱ्हाडे व दोन अल्पवयीन मुले हे त्यांच्या घरात घुसले. यावेळी त्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Eknath shinde : राज्यात सात खासदार असलेल्या शिंदे गटाची एकच राज्यमंत्रीपद देऊन मोदी सरकार ३.० मध्ये बोळवण

आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओ देखील तयार केला. हा व्हीडीओ आरोपी महेश सुभाष तांबे याला दिला. त्यानंतर महेश तांबे याने हा व्हिडिओ त्यातील एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पोलिसांनी यातील काही संशियाताना अटक केली आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलीस करत आहे.

यवतमाळमध्ये जंगलात राहणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र दरोडा

यवतमाळच्या महागांव तालुक्यात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी ३० लाखांची रोकड व दागिने लंपास केले. महागांव तालुक्यातील चिल्ली ईजारा या जंगलात ही घटना घडली आहे, पोलीस उपअधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस आधिकारी हनुमंत गायकवाड यांच्यासह डॉग युनिट, फिंगर प्रिंट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशीतचे वातावरण आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग