मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात चाललंय काय! पोलीस कर्मचाऱ्यांनीच टाकला पोलीस ठाण्यात दरोडा

पुण्यात चाललंय काय! पोलीस कर्मचाऱ्यांनीच टाकला पोलीस ठाण्यात दरोडा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 30, 2024 04:09 PM IST

Pune Crime News : पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

loni kalbhor police station
loni kalbhor police station

पुण्यात रक्षकच जर भक्षक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यातच अफरातफर केल्या प्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घडला आहे. या ठाण्यातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच दरोडा टाकला आहे. त्यांनी गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी परस्कर विकल्या आहेत.

या प्रकरणात दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे आणि राजेश दराडेया पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दुचाकी हस्तगत केल्या होत्या. या आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच दुचाकी परस्पर विकायला सांगितल्याची कबुली दिली.या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचं सांगत पोलीस कर्मचाऱ्यांनीच भंगार बाजारात विकायला सांगित्याचं आरोपीनं सांगितलं आहे.

स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी अनेक वेळा बोलावल्यानंतरही ते आले नाहीत. परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.

 

पोलीस उपायुक्तांनीया ४ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ माजली आहे.

WhatsApp channel