जन्मदात्या वडिलांनी पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यावर व हाता-पायावर गंभीर वार केले. ही खळबळजनक घटना पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाघोली येथे घडली आहे. जन्मदात्या बापानेच मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.
अक्षदा फकीरा दुपारगुडे असं मृत मुलीचं नाव आहे. याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात एक पित्यानेच आपल्या मुलीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला आहे. जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोके, हाता-पायावर वार करत गंभीर जखमी केले आहे.
वडिलांनी केलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या मावशीच्या फिर्यादीवरुन लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
पुण्यात चारित्र्याच्या संशयाववरुन पतीने फारशी आणि कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यात वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कर्वेनगर येथे मंगळवारी दुपारी घडली. यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पाच तासात अटक करण्यात आली आहे. लखन बालाजी कांबळे असे आरोपीचे नाव आहे. लखन कांबळे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. यावरुन त्यांच्यात वाद व्हायचे. मंगळवारी हा वाद टोकाला गेला. लखनने रागाच्या भरात घरातील फरशी कु-हाडीने पत्नीच्या डोक्यात वार करुन तिचा खून केला. यानंतर तो घरातून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.