Pune yerwada murder : पुण्यात येरवडा येथे हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. बहिणीला पळून नेल्याच्या रागातून एकाने मुलाच्या वडीलाची हत्या केली. कटाळू कचरू लहाटे (वय ५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नव आहे. तर इस्माईल शेख (वय २५) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. खून झालेल्या व्यक्तीचा मुलगा आणि आरोपी व त्याची बहीण मित्र आहे. आरोपीच्या बहिणीला त्याने पळून नेल्याने खुनाची ही घटना सोमवारी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा येथे लहाटे व शेख कुटुंबीय एकाच ठिकाणी राहण्यास आहेत. कटाळू लहाटे यांचा मुलगा व इस्माईल याची बहिण हे दोघांचे मित्र होते. दरम्यान, सोमवारी सकाळी कटाळू लहाटे यांचा मुलगा व इस्माईलची बहीण ही घरातून निघून गेली होती. या दरम्यान, बहिणीला लहाटे यांच्या मुलाने पळून नेल्याचा संशय इस्माईलला आला. या सोबतच त्याने तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचा संशय देखील इस्माईलला आला. या मुळे त्याचा राग अनावर झाला.
संतापाच्या भरात इस्माईल शेखने सोमवारी लहाटे हे घराजवळ उभे असतांना दुचाकीवरून मित्रासह आलेल्या इस्माईलने लहाटे यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात कटाळू यांच्या डोक्याला, हातावर गंभीर जखमा झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. यामुळे यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लहाटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपी इस्माईल शेखला अटक करण्यात आली आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येरवडा येथे कोयता गँगने वाहनांची तोडफोड केली होती. तर पिंपरी येथे रिल्स तयार करण्यासाठी देखील वाकड परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या वाढत्या घटनांमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संबंधित बातम्या