पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक करून संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या बहिणीवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटनाघडली आहे. ही घटना पुण्यातील गंज पेठेतशनिवारी रात्री घडली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी बागुल असे आरोपीचे नाव आहे. ऋषी बागुल याच्या प्रेयसीने त्याच्याशी संपर्क कमी करुन त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने त्याला राग आला. तसेच ती न भेटल्यामुळे त्याचा राग अनावर झाला.तो शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र प्रेयसी घराबाहेर न येता तिची बहिणी बाहेर आली. यावेळी प्रेयसीच्या बहिणीसोबत त्याचा वाद झाला.
त्यानंतर संतापाच्या भरात त्याने जवळच्या पिस्टलमधून प्रेयसीच्या बहिणीवर गोळ्या झाडल्या. मला जर ती मिळाली नाही तर मी कोणालाही सोडणार नाही, अशी धमकीही त्याने यावेळी दिली. गोळीबार केल्यानंतर त्याने प्रेयसीच्या राहत्या घराला बाहेरुन कडी लावून तो व त्याचा मित्रा फरार झाले.
या गोळीबारात प्रेयसीही किरकोळ जखमी झाली आहे.या घटनेनंतर खडक पोलीस ठाण्यात ऋषी बागुल आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात लक्झरी पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक पुरुष आणि एक महिला अशा दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास बॉलर पबजवळ हा अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक अल्पवयीन असून तो एका नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपरचा मुलगा आहे. पुणे शहराचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाने मद्यपान केले आहे की नाही? याची खातरजमा करण्यासाठी आम्ही त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात उपस्थित लोक कार चालकाला मारहाण करताना दिसत आहेत. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनी त्याला अडवले आणि त्याला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले
संबंधित बातम्या