Pune lonikand crime: पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यात आता लहान मुलांना देखील लक्ष्य केले जात आहे. ही मुले शाळेत देखील असुरक्षित असल्याचा एक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील वाघोली येथील एका प्रतिष्ठित शाळेत शिकणाऱ्या एका १० वर्षांच्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मोबाइलवर चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने शिपायाने या मुलावर अत्याचार केले. ही घटना १९ एप्रिल रोजी घडली असून या प्रकरणी सोमवारी मुलाच्या पालकांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी अत्याचार झालेल्या मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेबद्दल कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने लहान मुलाला दिली होती. यामुळे पीडित मुलगा हा घाबरला होता.
या घटनेची हकीकत अशी की, तक्रारदार महिलेचा मुलगा हा वाघोलीमध्ये एका मोठ्या शाळेत शिक्षण घेत आहे. १९ एप्रिल रोजी फिर्यादी यांनी मुलाला नेहमीप्रमाणे शाळेत सोडले. यावेळी आरोपी हा शाळेच्या दरवाज्या जवळ उभा होता. त्याने पीडित मुलाला त्याचे नाव विचारले. यावेळी त्याच्याशी गॉड बोलून त्याच्याशी जवळीक निर्माण केली. तसेच त्याला गॉड बोलून तुला चित्रपट आवडतात ना असे विचारले. याला मुलाने हो उत्तर दिले.
या नंतर आरोपीने त्याला चल मी तुला मोबाइल वर चित्रपट दाखवतो असे म्हणून त्याला शाळेच्या टॉयलेटमध्ये नेले. मात्र, याला मुलाने नकार दिला. त्यानंतर आरोपीने त्याला येथील कॅमेरे बंद आहे अशी बतावणी करून तू काळजी करू नको. कुणाला कोणाला काही समजणार नाही" असं सांगितलं तसेच त्याचे शोषण करण्यास सुरुवात केली. शिपायाच्या या कृत्यामुळे मुलगा घाबरला आणि पळून वर्गात गेला.
आरोपी हा मुलाच्या मागे वर्गात गेला. तुला येथेच चित्रपट दाखवतो असे म्हणून त्याने मोबाईल मध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली. या बाबत कुणाला काही सांगू नको नाही तर तुला मारेन अशी धमकी आरोपीने मुलाला दिली. घाबरलेल्या मुलाने घरी गेल्यावर हा प्रकार आईला सांगितला. यानंतर मुलाच्या आईने लोणीकंद पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या