पुण्यात चाललंय काय? खरेदीत दंग असलेल्या इंजिनीअर तरुणीची भररस्त्यात छेड काढून मारहाण; तरुणी जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात चाललंय काय? खरेदीत दंग असलेल्या इंजिनीअर तरुणीची भररस्त्यात छेड काढून मारहाण; तरुणी जखमी

पुण्यात चाललंय काय? खरेदीत दंग असलेल्या इंजिनीअर तरुणीची भररस्त्यात छेड काढून मारहाण; तरुणी जखमी

Updated Sep 04, 2024 02:12 PM IST

pune swargate molestation news : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. एका अट्टल गुन्हेगाराने स्वारगेट येथे एका आयटी अभियंता तरुणीची भर रस्त्यात छेड काढून तिला मारहाण केली.

पुण्यात चाललयं काय ? खरेदीत व्यस्त असणाऱ्या अभियंता तरुणीची भररस्त्यात छेड काढून मारहाण; तरुणी जखमी
पुण्यात चाललयं काय ? खरेदीत व्यस्त असणाऱ्या अभियंता तरुणीची भररस्त्यात छेड काढून मारहाण; तरुणी जखमी

Pune swarget crime : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे. खून, दरोडा, बलात्कार यासारखे प्रकार घडत असतांना आता भर रस्त्यात तरुणींची छेड काढण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. अशीच एक घटना उघडकीस स्वारगेट परिसरात घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये  संतापाची लाट उसळली आहे. स्वारगेट येथे एक आयटी अभियंता असलेल्या तरुणीची भर रस्त्यात छेड काढून तिला मारहाण करण्यात आली. यात तरुणी ही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कृष्णा बाबूराव सावंत (वय २५, रा. वांजरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) असे तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारी नुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे घटना ?

पीडित तरुणी ही मूळची कोल्हापूरची आहे. कोंढवा परिसरात ही मुलगी राहण्यास आहे. ही मुलगी मंगळवारी टीच्या मैत्रिणीसह लष्कर भागात खरेदीसाठी गेली होती. या वेळी स्वारगेट परिसरात बस थांब्याजवळ ही मुलगी थांबली होती. यावेळी आरोपी कृष्णा हा तिच्या जवळ आला. त्याने तिची छेड काढली. याला तरुणीने विरोध केला असता, आरोपीने तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तरुणीला त्याच्या तावडीतून सोडवून आरोपीला छोट देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी कृष्णावर या पूर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्याववर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर मारामारी केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे. तो जेलमध्ये होता. मात्र, त्याची सुटका झाल्याने तो बाहेर आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर