Pune Crime News : कल्याण व संभाजीनगर येथे मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना आता लोणावळ्यात देखील अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. एका पाच वर्षांच्या मुलीवर मद्यधुंद अवस्थेत एका पोलिसाने अत्याचार केला आहे. समाजाचे रक्षक असलेले पोलीसच भक्ष्यक झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या चिमूकलीने तीच्यावर बेटलेला प्रसंग घरी सांगितल्यावर या घटनेचा उलगडा झाला. ही घटना विसापुर किल्याच्या पायथ्याजवळ बुधवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पोलिस कर्मचारी हा ड्यूटीवर असताना दारूच्या नशेत होता. या नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पोलिस सचिन सस्ते याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
नाताळची सुट्टीनिमित्त काही पर्यटक हे विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी आले होते. यावेळी आरोपी पोलीस सस्ते या ठिकाणी बंदोबस्तावर तैनात होता. यावेळी जवळील एका हॉटेलमधून त्याने जेवण घेतले जेवण्याचे बिल देण्यासाठी तो हॉटेलमध्ये गेला. यावेळी तिघे असलेल्या एका ५ वर्षांच्या मुलीवर आरोपीची नजर गेली. त्याने लघुशंकेचा बहाणा करत हॉटेलच्या मागे मुलीला नेले. व या ठिकाणी त्याने त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यावेळी मुलीने विरोध गेला असता त्याने तिला चॉकलेट देतो असे सांगत हा प्रकार कुणाला सांगू नको असे सांगितले. मात्र, हा प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यावेळी नराधम पोलिस रस्ते हा पोलिस ठण्यातच होता. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी पोलिसाला अटक केली आहे.
पीडित मुलगी ही विसापुर किल्याच्या पायथ्याची राहते. तर तिच्या घरच्यांचे तिथे हॉटेल आहे. पीडित मुलीच्या आजीने दिलेल्या माहितीनुसार मुलगी ही हॉटेलजवळील वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. यावेळी मी आरोपी पोलिसाला जेवायला दिले. यानंतर मी शेतावर काम करण्यासाठी निघून गेले. यावेळी सून व भाची ही घरामध्ये स्वयंपाक बनवण्यात व्यस्त होत्या. दरम्यान, पोलिसाने मुलीला मागे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना झाल्यावर मुलगी ही रडत रडत काऊंटरजवळ तिच्या आईकडे गेली. तसेच त्या पोलिस काकांनी मला मागं नेत माझ्या अंतर्वस्त्रांमध्ये हात घातल्याचे सांगितले. यामुळे आईला मोठा धक्का बसला. तिने ही घटना तिच्या पतीला व सासुला फोन करून सांगितली. यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.
संबंधित बातम्या