मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : केळी फेकून दिल्याच्या कारणावरून खून; आरोपीला पाच वर्षांनंतर जन्मठेप
Pune crime
Pune crime (HT_PRINT)

Pune : केळी फेकून दिल्याच्या कारणावरून खून; आरोपीला पाच वर्षांनंतर जन्मठेप

25 January 2023, 13:35 ISTNinad Vijayrao Deshmukh

Pune Thergaon Murder Case : पुण्यात एकाने केळी फेकून दिल्याच्या किरकोळ कारणावरून विट डोक्यात घालून एकाचा खून केला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

पुणे : पुण्यात एकाने केळी न खाता ती फेकून दिल्याने झालेल्या वादात डोक्यात विट मारून एकाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुभाष धर्मा पवार (वय ४९, रा. थेरगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सुभाष वाघमारे यांचा खून झाल्याप्रकरणी मुलगा किशोर याने वाकड पोलिसांत फिर्याद दिली होती. ही घटना २८ संपटेंबर २०१७ मध्ये घडली होती. या खून प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक टी. एस. भोगम यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी डी. एस. पांडुळे आणि पोलिस नाईक अरुण कोल्हे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.

खून झालेला सुभाष वाघमारे, त्याचा मित्र बाळू अडागळे आणि आरोपी पवार पार्किंगमध्ये उभे असतांना बोलत होते. त्यावेळी अडागळे याने आईसाठी आणलेली केळी वाघमारे यांनी फेकून दिली. त्यामुळे वाघमारे आणि अडागळे यांच्यात वाद झाले. यामध्ये किरकोळ मार लागल्याने अडागळे निघून गेला. त्यानंतर पवार याने अडागळेची केळी का फेकून दिली म्हणत वीट डोक्यात घालून वाघमारे यांचा खून केला होता. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी केली. त्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

विभाग