मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात सावकारीचा पर्दाफाश; दोन सावकारांना ठोकल्या बेड्या

Pune Crime : पुण्यात सावकारीचा पर्दाफाश; दोन सावकारांना ठोकल्या बेड्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 11, 2022 05:23 PM IST

पुण्यात अवैध सावकारीच्या घटना वाढल्या आहे. गुरुवारी दोन सावकारांना अटक करण्यात आली आहे.

Crime News
Crime News (HT_PRINT)

पुणे: बेकायदेशिररित्या सावकारी करीत साडेसहा लाखांचे तब्बल ११ लाख ५० हजार वसूल करूनही आणखी पावणेदोन लाख रूपये मागणाऱ्या सावकारला खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. याच प्रकरच्या दुसऱ्या घटनेत साडेचार लाखांचे ८ लाख ४८ हजार वसूल करीत आणखी साडेतीन लाख रूपये मागणाऱ्यालाही बेड्या घातल्या आहेत. दोन वेगवगेळ्या गुन्ह्यातील सावकारी करणाऱ्यांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

झहीर जुल्फीकार सय्यद (वय ४४ रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराने अडचणीत असल्यामुळे झहीरकडून ५ लाख रूपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात झहीर प्रत्येक महिन्याला ४० हजारांची वसुल करीत होता. ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ कालावधीत दोन वर्षांत आरोपीने त्यांच्याकडून तब्बल १० लाख ४८ हजार वसुल केले.

दुसऱ्या गुन्ह्यात साडेसहा लाखांच्या बदल्यात तब्बल ११ लाख ५० हजार रूपये वसूल करूनही आणखी पावणेदोन लाखांची मागणी करणाऱ्या सावकाराला अटक केली. कासिब कदीर कुरेशी (वय ३३ रा. गाडीतळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराने कासिबकडून डिसेंबर २०२० मध्ये साडेसहा लाख रूपये व्याजाने घेतले होते. आरोपीने पेâबु्रवारी २०२२ पर्यंत त्यांच्याकडून ११ लाख ५० हजार रूपये वसूल केले.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सावकारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशा प्रकारे कुणाची फसवणूक होत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

WhatsApp channel