मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : एकतर्फी प्रेमातून मुलीला बेल्टने मारहाण करत केला बलात्कार

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून मुलीला बेल्टने मारहाण करत केला बलात्कार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 21, 2022 03:01 PM IST

पुण्यात एका मुलीने लग्नासाठी नकार दिल्याने माथेफिरूने मुलीला दुचाकीवर बाहेर नेत तिला बेल्टने मारहाण करत बलात्कार केला.

Pune Crime
Pune Crime (HT_PRINT)

Pune Crime : मैत्रीनीने लग्नाला नकार दिल्याने तिला बाईकवर बसवून बाहेर नेत बेल्टने मारहाण करत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शकिल बागवान असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पिडीतेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पिडीता आणि आरोपी बागबान हे मित्र आहेत. आरोपीचे पिडीतेवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तीने नकार दिल्याने त्याला राग आला. यानंतरही तो तीची मनधरनी करण्यासाठी तिचा पाठलाग करून त्रास देत होता.

मात्र, पिडीतेने त्याला दाद दिली नाही. पिडीने पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. याचा आरोपीला राग आल्याने त्याने पिडीतेला मारण्याची धमकी दिली. पिडीतेला दुचाकीवर बसवून बाहेर नेले. त्या ठिकाणी तीला बेल्टने मारहाण केली. एवढेच नाही तर तीच्यावर बलात्कारही केला. यानंतर तीला सोडून दिले.

या घटनेनंतर पिडीता मानसिक तणावाखाली होती. तीने हडपसर पोलिस ठाणे गाठत बागवान विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बागबान हा फरार असुन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या