मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : धक्कादायक! आईने अपमान केल्याने मैत्रिणीचा गळा आवळून खून
Pune crime
Pune crime (HT_PRINT)
27 June 2022, 15:53 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 15:53 IST
  • मैत्रिणीच्या आईने अपमान केल्याने मैत्रिणीचाच खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील चाकण येथील नाणेकरवाडी येथे घडली

Pune crime पुण्यातील चाकण येथील नाणेकरवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीच्या आईने अपमान केल्याने तो सहन न झाल्याने आलेल्या रागातून मित्राने मैत्रिणीचाच गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी (दि २६) सकाळी १० च्या सुमारास घडली. याप्रकरणी मित्राला चाकण पोलिसांनी गजाआड केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रितीकुमारी संतोष साह (वय १८, रा. नाणेकरवाडी, चाकण) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. तर विष्णुकुमार विनोद साह (वय २०) याला अटक करण्यात आली आहे. तरूणीच्या आईने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी याबाबत माहिती दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रितीकुमारी ही चाकण एमआयडीसीत एका कंपनीत कामाला होती. तर, आरोपी विष्णुकुमार हा सुद्धा एका कंपनीत कामाला आहे. प्रितीकुमारी आणि विष्णुकुमार यांच्यात मैत्री होती. प्रितीकुमारीच्या आईची आणि विष्णुकुमारचीही ओळख होती. प्रितीकुमारीच्या आईने विष्णुकुमार याचा अपमान केला होता. याचा राग त्याला होता. याच रागातून विष्णुकुमारने रविवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रितीकुमारीचा गळा आवळून खून केला. चाकण पोलिस तपास करत आहेत.

चाकण ही पुण्यातील उद्योगनगरी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. या ठिकाणी काम करणारा मोठा कामगार वर्ग आहे. मात्र, या उद्योगनगरीला गुन्हेगारी विळखा खालत आहे. या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणिवर आला आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग