पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेने आपल्या पेशाला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. ही घटना पुण्यातील गंज पेठेतील शाळेत घडली आहे. येथील एका महिला शिक्षिकेने दहावीत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या आवारातच लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित विद्यार्थी परीक्षेसाठी शाळेत आल्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला.
ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांना घडवायची ज्ञानार्जनाची जबाबदारी असते त्या शिक्षिकेनेच शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला. २७ वर्षीय शिक्षिकेने दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. विशेष म्हणजे हा किळसवाणा प्रकार शाळेच्या स्टाफ रूम मध्येच घडला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.
शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व शाळेच्या स्टाफरुममध्येच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. शाळेतील स्टाफ रूम मध्ये सुरू असलेल्या या कृत्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेला माहिती मिळताच त्यांनी स्टाफ रूममध्ये येऊन पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शाळा प्रशासनाने याची माहिती संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना दिली. मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकेला अटकही केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या शिक्षिकेची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
पुणे शहरातील गंज पेठेत असणाऱ्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. दहावीत शिकणारा पीडित मुलगा भवानी पेठ परिसरात राहत आहे. बोर्डाची परीक्षा सुरू होण्यापूर्वी शाळेत सुरू असलेल्या पूर्व परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला होता. त्यावेळी या महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यावर स्टाफ रुमवर नेऊन अत्याचार केले. आरोपी महिला शिक्षिका धानोरी येथे वास्तव्यास आहे.
पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम ७, ९ (फ), ११, ६, १२, १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या