मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खळबळजनक..! आळंदीतील एका महाराजाचा तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

खळबळजनक..! आळंदीतील एका महाराजाचा तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 26, 2024 11:30 PM IST

Devachi Alandi : आळंदीतीलएका महाराजावरतीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्यकरून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी दासोपंत महाराज
आरोपी दासोपंत महाराज

पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदीत वारकरी संप्रदायाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील समाजमन सुन्न झाले आहे. आळंदीतील एका महाराजावर तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (वय ५२ वर्षे) असं अटक केलेल्या महाराजाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आळंदीमध्ये राहणारा दासोपंत महाराज येथे मृदुंग वादन शिकवणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेचा संचालक आहे. यामध्ये जवळपास ६० ते ७० विद्यार्थी दासोपंत यांच्याकडे मृदुंग वाद्य शिकण्यासाठी येतात. मात्र दोन महिन्यापूर्वी दासोपंत यांनी एका विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने अन्य दोन अल्पवयीन मुलांसोबतही अनैसर्गिक कृत्य केले. या तीन मुलांवर त्याने अनेकवेळी अनैसर्गिक अत्याचार केले व कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. 

यातील एका मुलाला वेदना असह्य झाल्यानं, त्याने आपल्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर त्याच्या पालकाने थेट आळंदी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाकाळ केली. मात्र नंतर वरिष्ठांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा दाखल होताच अन्य दोन मुलांनीही महाराजांवर आरोप केले. अशाप्रकारे  दासोपंत महाराजांचं बिंग फुटलं. आत्तापर्यंत तीन अल्पवयीन मुलांवर नराधम दासोपंत महाराजांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 

आळंदी पोलिसांनी याप्रकरणी पॉस्को कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपी महाराजास अटक केली आहे. त्याचबरोबर महाराजाकडून आणखी कुणी पीडित असल्यास त्यांना पुढं येण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. या घटनेमुळं वारकरी संप्रदाय हादरला आहे.

WhatsApp channel