मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : परदेशात नोकरीच्या अमिषाने १५ जणांना ३२ लाख रुपयांनी गंडवले

Pune Crime : परदेशात नोकरीच्या अमिषाने १५ जणांना ३२ लाख रुपयांनी गंडवले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 23, 2022 07:28 PM IST

Pune Crime news : परेदेशांत नोकरी देण्याच्या आमिषाने तब्बल १५ जणांना ३२ लाख रुपयांचा चुना लावल्या असल्याची घटना पुण्यात उघडकीस आली असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : परदेशात जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी ते काही ही करायला तयार असतात. याचा फायदा घेऊन काहीना फसवल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. दुबई, कॅनडा अशा परदेशातील वेगवेगळया कंपनीत चांगल्या प्रकारची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तब्बल १५ जणांना ३२ लाख ६२ हजार रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार आरोपींवर लष्कर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुम संदीप गायकवाड, वनराज ऊर्फ पुष्कराज बाटे, अभिजीत राजेंद्र दळवी, अब्दुल उमर (सर्व रा.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत रमेश बापट (वय ३३, रा.घोरपडी, पुणे) यांनी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना मार्च २०२२ ते आतापर्यंत घडलेला अहे. तक्रारदार प्रशांत बापट हे परदेशात नोकरी शोधत होते. जस्ट डायलवरून त्यांनी वर्ल्ड ट्रव्हलसचे कुसुम गायकवाड यांचा नंबर घेऊन त्यांच्याशी संर्पक साधला. तक्रारदार यांना परदेशात चांगल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष आरोपींनी दाखवून त्यांच्याकडून १० लाख ५८ हजार रुपये घेतले. तर, अशाचप्रकारे सतर १४ जणांकडून २२ लाख चार हजार रुपये असे मिळून एकूण ३२ लाख ६२ हजार रुपये घेऊन कुणालाही नोकरीस न लावता किंवा परदेशात न पाठवता त्यांची फसवणुक केली.

गुंतवणुकीच्या अमिषाने सहा लाखांना गंडा

चेन मार्केटिंग मध्ये गुंतवणुक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून एका तरुणीची सहा लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात ३० वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सुरेंद्र काळबांडे या आरोपीला पोलीसांनी अटक करुन त्याच्यासह हर्षल गायकवाड, प्रियांशी अजमेरा आणि क्यु नेट कंपनीचे इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी त्यांच्या डायरेक्ट सेलिंग मल्टी लेवल मार्केटिंग चेन मार्केटींग असलेली कंपनी क्यु नेट या कंपनीत गुंतवणुक केल्यास, खुप पैसे मिळतात असे सांगुन मोठी स्वप्ने दाखवून सहा लाख रुपये भरण्यास सांगून फसवणूक केली.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग