Pune Drugs racket : पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांवर पुन्हा मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिल्ली आणि पुण्यात मंगळवारी टाकलेल्या छाप्यात तब्बल १६ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. हे मेफेड्रोन ड्रममध्ये लपून ठेवण्यात आले होते. ही कारवाई या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी पप्पू कुरेशी याने भाड्याने घेतलेल्या गोडमात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेफेड्रोन तयार करण्यासाठी कच्चा माल पुरविणारा आरोपी पप्पू कुरेशी याने भाड्याने एक गोदाम घेतला होता. याच गोदामावर कारवाई करत पोलिसांनी १६ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे ८२ ग्रॅम १५० मिलिग्रॅम मेफेड्रोन मंगळवारी जप्त केले.
पुण्यात कुरकुंभ एमआयडीसीत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३ हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. या प्रकरणी आरोपी कुरेशी हा फरार झाला होता. मात्र, कुरेशीला कर्नाटक राज्यातील यादगीर येथून अटक करण्यात आली होती.
कुरेशीने याने त्याचे साथीदार संदीप धुनिया हैदर शेख, अशोक मंडल, आणि शोएब शेख यांच्याशी संगमनत करून पुण्यातील विश्रांवाडी येथे अनाई दिल्लीत कुरकुंभ येथील एमआयडीसीत तयार झालेले मेफेड्रोन लपून ठेवले होते. याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. पुणे पोलिसांनी दिल्ली आणि पुणे परिसरात असणाऱ्या या गोदामात छापे टाकून मेफेड्रोन जप्त केले.
दरम्यान, कुरेशीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता,. कुरेशीने अमली पदार्थांचा साठा कोठे कोठे लपवला आहे याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली होती. कुरेशी कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील कारखान्यात मेफेड्रोन तयार करण्यासाठी कच्चा माल पाठवत होता. त्यामुळे त्यांचा कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील ॲड. नीलीमा इथापे-यादव यांनी न्यायालयात केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी कुरेशीच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांनी वाढ केली.
संबंधित बातम्या