पुणे : अमली पदार्थांची तस्करी करणार्या तिघा परप्रांतीयांना अमल पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी १७ लाख रूपये किंमतीचे ५ किलो ८१६ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अफीमची कारवाई करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
सुमेर जयरामजी बिष्णोई (वय ५० रा. कोंढवा-बुद्रुक), चावंडसिंग मानसिंग राजपुत, लोकेंद्रसिह महेंद्रसिह राजपुत (सर्व रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या सूचनेनुसार पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कोंढवा बुद्रूक परिसरात एकजण अफीमची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६४ लाख २८ हजारांचे अफिम जप्त करण्यात आले. चौकशीत त्याने दोघाजणांकडून अफिम घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने चावंडसिंग आणि लोकेंद्रसिह यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५२ लाखांचे अफिम जप्त करण्यात आले.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन जास्तीत जास्त तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. १७ ऑगस्टला पेट्रोलिंगवेळी पथकाने कोंढव्यातील गोकुळनगर परिसरातून अमली तस्करांचे रॅकेट उध्वस्त केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, एपीआय शैलजा जानकर, पांडुरंग पवार, सचिन माळवे, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंके, संदिप शिर्के, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड म्हणाले, कोंढवा परिसरात अफिम विक्रेत्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेउन ६४ लाख २८ हजारांचे अफिम जप्त केले. त्याच्या इतर दोन साथीदारांकडून ५२ लाखांवर ड्रग्ज जप्त केले आहेत.
संबंधित बातम्या