मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : धक्कादायक ! एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या
 film and television institute of India (FTII)
film and television institute of India (FTII)
05 August 2022, 13:01 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 13:01 IST
  • पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया येथे अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

पुणे : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (एफटीआयआय ) मध्ये शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अश्विन अनुराग शुक्ला (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो साल्वादोर नॉर्थ गोवा येथील मुळ रहिवाशी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डेक्कन पोलिस ठण्याचे ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षास लॉ कॉलेज मार्गावरील एफटीआयआय महाविद्यालयात मुलांच्या जुन्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने स्व:ताला आतून बंद केले असून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानुसार डेक्कन पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित ठिकाणी अश्विनच्या बी ब्लॉक रुम क्रमांक एस-१२ च्या दरवाजाच्या वरील खिडकीतून पोलिसांनी आत डोकावून पाहिले असता आश्विन शुक्लाने खिडकीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. त्याचा मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे काही दिवासंपूर्वी त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

पोलिसांनी अग्नीशामक दलाच्या जवनांना घटनास्थळी बोलाऊन घेत आतून बंद असलेला दरवाजा उघडून मृतदेह ताब्यात घेरला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी हा प्रकार हा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिसून येत आहे. बाजूच्या खोलीत राहणाऱ्या मुलांनी अश्विन शुक्ला यास शेवटचे मंगळवारी पाहिल्याचे सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली सुसाईड नोट न सापडल्याने त्याने आत्महत्या का केली याचा उलगडा झालेला नाही.