मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या पंजाब आणि बिहारमधील ६ बुकिंच्या मुसक्या आवळल्या
Pune crime
Pune crime (HT_PRINT)

Pune Crime : आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या पंजाब आणि बिहारमधील ६ बुकिंच्या मुसक्या आवळल्या

25 May 2023, 14:23 ISTNinad Vijayrao Deshmukh

Pune IPL Betting crime : आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या बिहार आणि पंजाब येथील तब्बल ६ बुकींना पुणे पोलिसांनी रंगेहात अटक केली.

पुणे : पुण्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या पंजाब आणि बिहारमधील बुकींना पुणे पोलिसांच्या  सामाजिक विभाग पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई खराडी परिसरातील गॅलक्सी वन सोसायटीमधील नवव्या मजल्यावरील एका फ्लॅट बुधवारी रात्री ९ च्या सुमारास करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी ५ लाख रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. यात १६ मोबाईल आणि २ लॅपटॉपचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

2000 notes : दोन हजारची नोट बंद झाल्याने लोक खूष; सर्वेक्षणातून समोर आलं 'हे' कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गौरव दयाराम धरमवाणी (वय २७, मुळ रा. ब्लॉक शिवानंदनगर, खमतराई, रायपुर, छत्तीसगड), सुनिश तुलशीदास लखवानी (वय २५, मुळ रा. महाविर स्कुल, मच्छी तलावाजवळ, गुडीयारी, रायपुर, छत्तीसगड), जपजीतसिंग आतमजीतसिंह बग्गा ( वय २५, मुळ रा. सिंधी गुरूव्दाराजवळ, पांढरी आटा चक्की समोर, रायपुर, छत्तीसगड), जसप्रित मनजिंदरसिंग सिंह (वय २९, मुळ रा. रस्ता नं.१०, शिवाजीनगर, लुधीयाना, पंजाब), तरणदीप बलजींदर सिंह (वय ३३, रा. शास्त्री स्कुलवाडी गल्ली, शिवाजीनगर, लुधीयाना, पंबाज) आणि लालकिशोर दुखी राम (वय ३७, मुळ रा. बीहरौना, दरभंगा, बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Monsoon Update : मॉन्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण; भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची अपडेट

पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला खराडी येथील एका सासोयटीतील फ्लॅटमध्ये आयपीएलच्या सामन्यांवर बेटिंग होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे यांनी पथक तयार करून घटनास्थळी जात सापळा रचला.

 

त्यानंतर खराडी येथील गॅलक्सी वन सोसायटीमधील नवव्या मजल्यावर फ्लॅटवर छापा टाकला असता वरील आरोपी त्यांना आयपीएल सामन्यावर सट्टा लावत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. दरम्यान, त्यांच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल आणि १६ मोबाईल हॅन्डसेट, २ लॅपटॉप, वायफाय राऊटर आणि रोख रक्कम असा एवज जप्त करण्यात आला आहे.

विभाग