Trainee JAS officer Puja Khedkar Summon: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची अनेक प्रकरणे भेर येत असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार केली होती. य प्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकारी पूजा खेडकर यांना समन्स बजावले असून आज गुरुवारी (१८ जुलै) पुणे पोलीसांपुढे हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितला आहे. या वृत्ताला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील दुजोरा दिला असून पूजा खेडकरला तिचा जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात येण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज पूजा खेडकर या पुण्यात येणार का आणि त्या जबाब नोंदवणार या कडे लक्ष लागून राहिले आहे.
ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांच्या बडेजाव स्वभावामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. या प्रकरणी त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी आयएएस हे पद कसे मिळवले या बाबत देखील अनेक धक्कादाय माहिती पुढेयेत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. असे असतांना त्यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करत पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांत तक्रार दिली होती. हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून त्यासाठी वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात आले आहे. आता याबाबतची चौकशी पुणे पोलीस करणार आहेत.
याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना विचारले असता ते म्हणाले, "माझ्याविरुद्ध अशी कोणतीही तक्रार असल्याची मला माहिती नाही. याबाबत कोणीही मला सांगितले नाही. त्यामुळे प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच उद्भवतच नाही. माध्यमातून मला या तक्रारीची माहिती मिळाली, असे दिवसे म्हणाले.
पूजा खेडकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात वाशिम पोलिस ठाण्यात छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.
पूजा खेडकर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नागरी सेवांमध्ये निवडीसाठी बनावट अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणादरम्यान केलेल्या वर्तनाबद्दलही त्याची चौकशी सुरू आहे. या वादांमध्ये, सरकारने पूजा खेडकरचा 'जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम' रद्द करत त्यांना मसूरी येथे पुन्हा परत बोलावले आहे, तसेच 'आवश्यक कारवाईसाठी' त्यांची चौकशी देखील केली जाणार आहे.
संबंधित बातम्या