पुण्यात बावधन येथे डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळले! दोन पायलटसह अभियंत्याचा मृत्यू-pune chopper crash near bavdhan budruk casualty 3 deaths ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात बावधन येथे डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळले! दोन पायलटसह अभियंत्याचा मृत्यू

पुण्यात बावधन येथे डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळले! दोन पायलटसह अभियंत्याचा मृत्यू

Oct 02, 2024 09:34 AM IST

pune bavdhan helicopter crash : पुण्यातील बावधन येथे आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. यात तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्यात बाधवण येथे हेलिकॉप्टर कोसळले! तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता
पुण्यात बाधवण येथे हेलिकॉप्टर कोसळले! तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता

pune bavdhan helicopter crash : पुण्यात बावधन बुद्रुक गावाजवळ बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेची माहिती स्थानिकांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. या अपघातात तीन जण ठार झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन पायलट आणि एक इंजिनियर असल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूला निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरीत कोसळले.

पुण्यातील लवळे येथील ऑक्सफर्ड येथून आज सकाळी एका ७.३० च्या सुमारास हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतले होते. मात्र, धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर बावधन परिसरात एका डोंगरावर कोसळल्याची माहिती आहे. बावधन बुद्रुक व ऑक्सफर्ड आणि एच.ई.एम.आर. एल. मधील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळले. आहे. या घटनेत तिघे जण ठार झाल्याची माहिती आहे.

सकाळी ७.३० वाजता ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅड वरून उड्डाण केल्यानंतर दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ४ वाहने घटणास्थळी रवाना करण्यात आली आहे. या सोबतच शासकीय रुग्णवाहिका १०८ देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

मृतांमध्ये दोन पायलट आणि एका अभियंत्याचा समावेश 

ऑक्सफोर्ड येथील हेलीपॅडवरून या हेलिकॉप्टरने टेकऑफ घेतले होते. या परिसरात सकाळी मोठे धुके असल्याने येथील डोंगराचा अंदाज न आल्याने हे हेलिकॉप्टर कोसळले. यात दोन पायलट आणि एका अभियंत्याचा मृत्यू झाला आहे.  मुंबईला जाणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. यामध्ये वैमानिक परमजीत सिंग आणि जीके पिल्लई आणि अभियंता प्रीतम भारद्वाज यांचा समावेश होता. हेलिकॉप्टर पुण्याच्या हेरिटेज एव्हिएशनचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघाताची काही छायाचित्रे आणि व्हिडिओही समोर आले आहेत.

डोंगराळ भाग

बावधन येथे एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट असून येथून आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र, धुके असल्याने हे हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले. या घटनेची माहिती हिंजवडी पोलीसांच्या कंट्रोल रुमला देण्यात आली. यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस व अग्निशामक दलासह इतर यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या. ही पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ऑक्सफोर्ड येथील रिसॉर्टमध्ये मुंबईहूं अनेक बड्या व्यक्ति या पर्यटनासाठी येत असतात. त्यांच्यासाठी या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. हा सगळा परिसर डोंगराळ आहे. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात मोठ्याप्रमाणावर धुके आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तवविला जात आहे.

Whats_app_banner
विभाग