मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident Case : ‘ससून’मधील 'त्या' २ डॉक्टरांच्या निलंबनानंतर आता अधिष्ठातांवरही कारवाई; डॉ. काळे सक्तीच्या रजेवर

Pune Accident Case : ‘ससून’मधील 'त्या' २ डॉक्टरांच्या निलंबनानंतर आता अधिष्ठातांवरही कारवाई; डॉ. काळे सक्तीच्या रजेवर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 30, 2024 08:12 AM IST

Pune porsche car case : पुणे पोर्श अपघात प्रकरणात वेगाने घडामोडी घडत आहे. बुधवारी रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी दोन डॉक्टर आणि शिपायाला निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता थेट ससुनच्या डीनवर कारवाई करण्यात आली असून त्याना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

ससुनच्या डीनवर कारवाई करण्यात आली असून त्याना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
ससुनच्या डीनवर कारवाई करण्यात आली असून त्याना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

Pune porsche car case : कल्याणीनगर अपघात प्रकरणात वेगाने घडामोडी घडत आहेत. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना कचऱ्यात फेकून अहवालात फेरफार केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर व सफाई कामगार अतुल घटकांबळे या तिन्ही आरोपींना बुधवारी निलंबित करण्यात आले. तर हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याबद्दल ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Navi sangvi murder : पुण्यातील सांगवी परिसर गोळीबाराने हादरला! दोघा हल्लेखोरांनी केली तरुणाची हत्या

पुणे पोर्श अपघात प्रकरण विविध वळणे घेत आहेत. पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे. या प्रकरणी शासनाने एसआयटी स्थापन केली असून या समितीने काल त्यांच्या अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. काल डॉक्टर आणि अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने खबळलब उडाली आहे.

ससुन रुग्णालयात गौडबंगाल सुरूच

ससून रुग्णालय गेल्या दोन वर्षात अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. किडनीतस्करी प्रकरण, ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण, उंदीर चावल्यामुळे रुग्णनाचा मृत्यू तर आता अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताचा नमूना बदलल्यामुळे ससुनचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.

Bhusawal Murder : भुसावळमध्ये धावत्या कारवर गोळीबार! माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या, गावात तणाव

या प्रकरणी स्थानपण करण्यात आलेल्या एसआयटीने बुधवारी त्यांचा अहवाल शासनाला सादर केला. यानंतर या प्रकरणात तातडीने कारवाई न केल्याने आरोपी डॉक्टर आणि शिपायासह डीन काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच डॉ. अजय तावरे, श्रीहरी हाळनोर व तसेच सफाई कामगार अतुल घटकांबळे या तिघांना निलंबित करण्यात आले असून या दरम्यान त्यांना दुसरी नोकरी आणि उद्योग करता येणार नाही अशी देखील सूचना देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे ससुनचा गैरकरभार चव्हाट्यावर आला आहे.

डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे ससुनचा अतिरिक्त कार्यभार

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शिफारशीनुसार डॉ. काळे यांनी रक्तनमुना फेरफार प्रकरणावर नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता ससुनचा अतिरिक्त कार्यभार हा बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना देण्यात आला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग