Pune Porsche Accident: नातवामुळे आजोबाला जेल वारी! ‘या’ कारणामुळे सुरेंद्र कुमार अगरवालला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche Accident: नातवामुळे आजोबाला जेल वारी! ‘या’ कारणामुळे सुरेंद्र कुमार अगरवालला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Porsche Accident: नातवामुळे आजोबाला जेल वारी! ‘या’ कारणामुळे सुरेंद्र कुमार अगरवालला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Updated May 25, 2024 10:15 AM IST

Pune Porsche Accident: पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आता नवे खुलासे समोर येत आहेत. पुणे पोलिसांवर चौकशी दरम्यान दिरंगाई केल्याचा आरोप केल्यानंतर पुणे पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे.

अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमारला पुणे पोलिस क्राइम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत.
अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमारला पुणे पोलिस क्राइम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत.

Pune Porsche Accident: पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आता नवे खुलासे समोर येत आहेत. पुणे पोलिसांवर चौकशी दरम्यान दिरंगाई केल्याचा आरोप केल्यानंतर पुणे पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे \. त्यातच आता विशाल अग्रवाल यांचे वडील म्हणजेच अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमारला पुणे पोलिस क्राइम ब्रांचने बेड्या ठोकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांची चौकशीसाठी बोलण्यात आल होतं. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

सुरेंद्र कुमार यांना अटक का केली ?

सुरेंद्र कुमार यांचे छोटे राजनशी संबंध असल्याचं समोर आल होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या नातवाला वाचवण्यासाठी धडपड केल्याच निष्पन्न झाल. ड्रायव्हर ला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल अगरवालची रवानगी येरवडा तुरुंगात

पुण्यातील बिल्डरविशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत अलिशान पोर्शे कार २०० च्या स्पीटने चालवून दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची रवानगी बालसुधार गृहात केली आणि पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. दरम्यान, आरोपीचे वडील विशाल आगरवाल याला न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. पोलिसांनी विशाल अग्रवालला पोलीस कोठडीत पाठवण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

सुरेन्द्र अगरवाल यांनी ड्रायव्हरला धमकावले

अपघात घडल्यानंतर या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात सुरेन्द्र अगरवाल याने ड्रायव्हरवर हा गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी दबाव टाकला होता. या ड्रायव्हरला हा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. चालकाने दिलेल्या जबाबात याचा खुलासा करण्यात आला होता. आज पहाटे ३ च्या सुमारास सुरेंद्रकुमार अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली. पुराव्यांशी छेडछाड करण्याचा आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याने सुरेन्द्र कुमार याला अटक करण्यात आली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर