मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Car Accident : देवदर्शनासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात; दोन विद्यार्थी ठार

Pune Car Accident : देवदर्शनासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात; दोन विद्यार्थी ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 04, 2022 12:42 PM IST

Pune Car Accident : पुण्यातील एमआयटी कॉलेजमधील विद्यार्थी देवदर्शनाला जात असतांना करवारील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे सासवड मार्गावर नारायणपुर येथे घडला.

अपघातग्रस्त कार
अपघातग्रस्त कार

पुणे : देव-दर्शनासाठी जात असलेल्या पुण्यातील एमआटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एका कारला कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटी होन भीषण अपघात घडल्याची घटना सासवड परिसरात सोमवारी रात्री घडली. यात कार मधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

गौरव लवानी (वय १९,रायपूर, छत्तीसगढ), रचित मेहता ( वय १८ .रा.कलकत्ता) असे या अपघातात मयत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर तीन विद्यार्थीनींसह एकूण पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमी झालेले विद्यार्थी हे पुण्यातील नामांकित एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

सासवड परिसरातील नारायणपूर येथील दत्त महाराज मंदिरात देवदर्शनसाठी ते सोमवारी रात्री कारने जात होते. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या कारवरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटून कार दोन दुकानांना धडकून पलटी झाली. या घटनेत जागेवरच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. तर तीन विद्यार्थीनीसह पाचजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताबाबत सासवड पोलिस पुढील तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग