कॅब चालकाच्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवला सोफ्यात! पुण्यातील हडपसर येथील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कॅब चालकाच्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवला सोफ्यात! पुण्यातील हडपसर येथील धक्कादायक घटना

कॅब चालकाच्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवला सोफ्यात! पुण्यातील हडपसर येथील धक्कादायक घटना

Nov 11, 2024 07:16 AM IST

Pune Hadapsar Murder : पुण्यात हडपसर येथे एका कॅब चालकाच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह हा सोफ्यात लपवल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेचा पती हा बाहेर गावी गेला होता.

कॅब चालकाच्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवला सोफ्यात! पुण्यातील हडपसर येथील धक्कादायक घटना
कॅब चालकाच्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवला सोफ्यात! पुण्यातील हडपसर येथील धक्कादायक घटना (HT File Photo)

Pune Hadapsar Murder : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर येथे कॅबड्रायव्हर गावी गेला असतांना त्याच्या पत्नीची कुणीतरी हत्या करून मृतदेह हा घरातील सोफ्यात लपवून ठेवला.  हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात ही घटना घडली. महिलेच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.  पती घरी आल्यावर त्याला घरात पत्नी दिसली नाही. यामुळे त्याने तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. दरम्यान, दोन दिवसानंतर तिचा मृतदेह घरातील सोफ्यात आढळला.  

स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. अष्टविनायक कॉलनीजवळ, हुंडेकरी वस्ती, फुरसुंगी ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वप्नाली यांचा खून करुन मृतदेह सोफ्याच्या कप्यात ठेवला होता. या बाबतची माहिती पोलिसांना शुक्रवारी मिळाली.  या प्रकरणी स्वप्नाली यांचे पती उमेश यांनी तक्रार दिली.  स्वप्नाली हिचा पती उमेश हा कॅब चालक आहे.  तो शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास बीडला प्रवासी घेऊन गेला होता.  या दरम्यान, त्याने पत्नी स्वप्नालीची चौकशी करण्यासाठी तिला फोन  केला. तिला वारंवार फोन  करून देखील तिने फोन  उचलला नाही. त्यामुळे उमेशला काळजी पडली. त्यामुळे त्याने त्याच्या मित्राला फोण करून घरी जाऊन येण्यास सांगितले. मात्र, त्याने घर बंद असल्याचे सांगितले. दरम्यान,  शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास तो घरी परत आला. यावेली त्याला  घराला बाहेरून कडी लावल्याचे दिसले. दरम्यान, घराची  कडी उघडल्यानंतर त्याला  पत्नी घरात दिसली नाही. त्याने तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.    पत्नीचा शोध घेत मित्राच्या दुचाकीवरून उमेशने  हडपसर परिसरात पत्नीचा शोध घेतला.  तो त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या आणि कुटुंबियांच्या घरीही गेला, पण स्वप्नाली कुठेच सापडली नाही.

उमेशला स्वप्नालीचा मृतदेह कसा सापडला ? 

पत्नीचा दोन दिवस शोध घेत उमेश सोफा-कम-बेडवर झोपला होता. शनिवारी पहाटे पत्नीच्या काही मौल्यवान वस्तूही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सोफ्याचा स्टोअरेज डबा उघडला असता त्यात पत्नीचा मृतदेह दिसला.

फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगल मोढवे यांनी सांगितले की, दुर्दैवाने तो ज्या सोफ्यावर झोपला होता,त्याच सोफ्यात पत्नीचा मृतदेह सापडल्याने तो हादरलेल्या अवस्थेत आहे." स्वप्नालीची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे, असे मोढवे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. उमेशला पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने याची माहिती हडपसर पोलिसांना दिली. पुणे पोलिसांचे पथक  त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मृतदेह हा  शवविच्छेदसाठी पाठवण्यात आला. प्राथमिक अहवालात  स्वप्नाली खून हा  गळा दाबून असल्याचे स्पष्ट झाले आगे. या अहवालात तिच्या  गळ्यावर नखांच्या खुणा ही आढळल्या आहेत.

संशयित घरातील असण्याची शक्यता  

स्वप्नाली घरात असतांना तिच्या घरात  कुणी बळजबरीने घुसल्याचा कोणताही पुरावा दिसला नाही. त्यामुळे आरोपी हा  तिच्या ओळखीचा असावा, असे पोलिसांनी सांगितले. स्वप्नालीचा मृतदेह सापडल्यापासून संशयती  व्यक्तीचा फोन बंद आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

पती उमेशबाबत बोलायचे झाले तर गुन्ह्याच्या वेळी तो पुण्यात नव्हता, हे सिद्ध झाले आहे. हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सांगितले की, महिलेच्या गळ्यावरील नखांच्या खुणा आणि जखमांवरुन आरोपीने  तिचा गळा दाबून खून केल्याची शक्यता आहे.

उमेश आणि स्वप्नाली यांच्या लग्नाला चार वर्षे झाली होती आणि ते भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांच्या सोसायटीत  ना सुरक्षा रक्षक होता ना सीसीटीव्ही. पोलिसांनी सांगितले की ते दाम्पत्याच्या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांनी सांगितले की, संशयित या दाम्पत्याच्या घरी वारंवार येत असे आणि कधीकधी त्यांच्यासोबत राहायाचा देखील. पोलिसांच्या श्वानाने घटनास्थळावर एक मार्ग आणि काही बोटांचे ठसे शोधून काढले. एसीपी राख यांनी सांगितले की, संशयित त्याच परिसरात घोंडाळेनगर मधील त्याच्या घरी सापडला  नाही. उमेशच्या तक्रारीवरून खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर