Pune police Viral Video : पुणे गेल्या काही दिवसांपासून काही ना काही कारणाने सारखे चर्चेत आहे. पुण्यात अनेक घटना घट असतांना आता आणखी एक घटना पुढे आली आहे. या घटनेमुळे जर कायद्याचे रक्षकच जर कायदा हातात घेणार असेल तर सामान्य जनतेचे काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यात पीएमटी बसचा धक्का लागला म्हणून एका पोलीसाने पीएमटी बसला दुचाकी आडवी लावून गाडी थांबवत पीएमटी चालकाला फ्री स्टाईल हाणामारी केल्याची घटना कोरेगाव पार्क येथ घडली आहे. या बसमध्ये प्रवासी असतांना देखील पोलिसाने चालकाला मारहाण केली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. शेवटी तीन हजार देऊन हे प्रकरण मिटवल्या गेल्याचे देखील पुढं आलं आहे.
ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरात घडली. एक पीएमटीचालक हा प्रवाशांना घेऊन जात असतांना पीएमटीने रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या पोलिसाला बाजूला दाबले. याचा राग पोलिसाला आला. त्याने थेट पीएमटी अडवत चालकाला दमबाजी करत त्याला बेदम मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
पीएमटी चालकास मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाने या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. त्यात रविवार त्याचा व पीएमटी चालकाचा वाद झाल्याचे पोलिस शिपायाने म्हटले आहे. पीएमटी चालक भागवत तोरणे व पोलिस कर्मचारी आर. ए. वाघमारे आम्ही दोघे आमचा वाद झाल्यावर स्वत: पोलीस स्टेशन येथे गेलो व हा वाद समजुतीने मिटवला आहे. पीएमटी चलकाबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. पीएमटी ट्रिपचे नुकसान झाल्याने मी मी त्याचे ३००० हजार रुपये रोखीने भरले.
पुण्यात पोलिस आणि पीएमटी चालकाच्या हाणामारीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून याची चर्चा दिवसभर पुण्यात होती. पीएमटी चालकाने गाडी चालवताना पोलीस शिपायाच्या दुचाकीजवळून चालवल्याचा आरोप पोलिसाने करत यावरून दोघांनमध्ये आधी बाचाबाची व नंतर थेट मारहाण झाली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर चांगलीच व्हायरल झाली आहे.
संबंधित बातम्या