Bopdev Ghat rape case accused arrested : पुण्यात गेल्या आठवड्यातील गुरुवारी बोपदेव घाटात टेबल पॉइंट येथे मित्रा सोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून व मित्राला जीवे मारण्याची धमकी देऊन आळीपाळीने बलात्कार केला होता. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण राज्य हादरले होते. गेल्या सात दिवसांपासून पोलिस आरोपींचा शोध घेत होते. अखेर तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी दोघांना नागपूर येथून तर एकाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
पुण्यात गेल्या गुरुवारी (दि ३) एक तरुणी ही तिच्या मित्रा सोबत बोपदेव घाटातील टेबल पॉइंट येथे रात्री ११ च्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. यावेळी येथे फिरत असतांना तिघांनी या दोघांना कोयत्याचा आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तु काढून घेत तरुणाला बांधून मारहाण केली होती. यानंतर तरुणीला तिच्या मित्राला जीव मारण्याची धमकी देत त्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली होती. तब्बल ७ दिवसांपासून पुणे पोलिस आरोपींचा शोध घेत होते. या साठी आधुकीक तंत्रज्ञानाचा एआय सिंबाचा वापर पोलिसांनी केला. या सोबतच ३ हजार पेक्षा अधिक फोन कॉल तपासण्यात आले तर २०० पेक्षा अधिक आरोपींच्या चौकशी करण्यात आली. या सर्व प्रयत्नांनंतर पुणे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील एका संशयित आरोपीला पुण्यातून तर, दोघांना नागपुरातून अटक केली आहे.
येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना ३ संशयित तरुण सीसीटिव्हीमध्ये कैद झाले होते. या सीसीटिव्हीद्वारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दुपारपर्यंत या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आणखी मोठी एक अपडेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे ६० पथकं हे गेल्या ९ दिवसापासून शोध घेत होते. आरोपी हे मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र देखील जारी केले होते. तर आरोपींची माहिती देणाऱ्याला १० लाखांच देखील बक्षीस जाहिर केलं होतं.
संबंधित बातम्या