पुण्यात आजपासून रंगणार पुस्तक महोत्सव! बुक फेस्टिवलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लेखक साधणार संवाद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात आजपासून रंगणार पुस्तक महोत्सव! बुक फेस्टिवलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लेखक साधणार संवाद

पुण्यात आजपासून रंगणार पुस्तक महोत्सव! बुक फेस्टिवलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लेखक साधणार संवाद

Dec 14, 2024 01:06 PM IST

Pune Book Festival : पुण्यात आज पासून पुढील चार दिवस बूक फेस्टिव्हल रंगणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

पुण्यात आजपासून रंगणार पुस्तक महोत्सव! बुक फेस्टिवलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लेखक साधणार संवाद
पुण्यात आजपासून रंगणार पुस्तक महोत्सव! बुक फेस्टिवलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लेखक साधणार संवाद

Pune Book Festival : पुण्यात आज पासून पुढील चार दिवस बूक फेस्टिव्हल रंगणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात विविध पुस्तकांची ६०० दालने लावली जाणार आहे. जगभरातील साहित्यातील पुस्तके खरेदी करण्याची आणि वाचण्याची संधी वाचनप्रेमींना या ठिकाणी मिळणार आहे.

पुणे पुस्तक महोत्सव आज शनिवारपासून (ता. १४) फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानात सुरू होत आहे. २२ तारखेपर्यंत हे प्रदर्श सुरू राहणार आहे. आज या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या पुस्तक महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी बाल चित्रपट महोत्सव, कार्यशाळा, तसेच लिट फेस्टिव्हल अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल पुढील चार दिवस या प्रदर्शनात राहणार आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने या पुस्तक महोत्सवाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पासून या प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात करण्यात येत आहे. या वर्षी पुणे पुस्तक महोत्सव हा १४ ते २२ डिसेंबरदरम्यान प्यार पडणार होणार आहे. महोत्सवादरम्यान भारतीय भाषांमधील पुस्तकांची दालने सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू राहतील, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) विश्वस्त राजेश पांडे यांनी दिली.

पुणे पुस्तक महोत्सवात यंदा २० ते २२ डिसेंबर या कालावधीत लिट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यात २५ पेक्षा अधिक सत्र विविध विषयांवर होणार आहेत. हे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार असून, ते मोफत राहणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी मोफत उपक्रम

१४ ते २२ डिसेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळ व दुपारच्या सत्रात कथाकथन, चित्रकला, नृत्य, संगीत आणि वैदिक गणित या विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आहेत. पुणे चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हल १४ ते १८ डिसेंबर दरम्यान दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुस्तकांचा वापर करून सरस्वती देवीची कलाकृती तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. नीलकंठ प्रकाशन आणि नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तकांनी तयार करण्यात आलेली ही कलाकृती एक हजार चौरस मीटरमध्ये पसरली असून जिवंत रंग, सुसज्ज पुस्तकांचा वापर अशा विविध निकषांची पूर्तता करण्यात आली आहे.

नीलम गोऱ्हे यांनी या विक्रमी कामगिरीचे कौतुक करत अशा कामगिरीसाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांवर भर दिला. मुलांच्या मोबाइल फोनच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आणि दिशाभूल करणाऱ्या मजकुराचे धोके यावर ही चर्चा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ऑस्ट्रेलियाने शाळांमध्ये मुलांसाठी मोबाइल वर बंदी घातली असून भारतानेही या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजनांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

गेल्या वर्षीच्या महोत्सवाने चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले असून यंदा पाच विक्रम मोडण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती महोत्सवाच्या समन्वयक बागेश्री मंथलकर यांनी दिली. 'सरस्वती यंत्र कलाकृतीतील विश्वविक्रमाने महोत्सवाची सुरुवात पुण्याचे पुस्तकांशी असलेले सखोल नाते दर्शविते. राजेश पांडे यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर