Pune bharti vidyapith Rape Crime : पुण्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी रविवारी तिघांवर गुन्हा दाखल केला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वैभव शिवराम मेरगो (वय ३२, रा. कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर), प्रशांत पांडुरंग बनसोडे (वय ४०, रा. टेंभुर्णी ता. माढा, सोलापूर) आणि सुमित वाल्मीकी (वय २५, रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वैभव मोरगो आणि प्रशांत बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा तिसरा साथीदार सुमित वाल्मीकी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. फिर्यादीची १४ वर्षीय मुलगी ही सप्टेंबर २०२२ मध्ये बेपत्ता झाली होती.
आरोपी वैभवने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले होते. यानंतर साथीदार सुमित व प्रशांत यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव मोरगो याची चॉकलेट वितरणची एजन्सी आहे तर आरोपी प्रशांत बनसोडे वाहतूकदार आहे.
वैभवने तक्रारदार यांच्या १४ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर सुमित व प्रशांत यांच्या मदतीने १८ सप्टेंबर २०२२ रोजी आरोपींनी फिर्यादीच्या मुलीला पळवून नेले. मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना देखील त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी हे मुलीला घेऊन प्रशांत याच्या छत्रपती संभाजीनगरमधील घरी गेले. त्या ठिकाणी देखील त्यांनी मुलीवर अत्याचार केले. दरम्यान, आरोपी वैभवने मुलीचे मोबाइलवर नग्न चित्रीकरण करूनतिला धमकी दिली. ऐवढेच नाही तर आई व भावाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीं दिली. पोलिसांनी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली असून मुलीचा शोध घेऊन तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संबंधित बातम्या