मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३० ते ३५ तोळ्याचे दागिने लंपास

Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३० ते ३५ तोळ्याचे दागिने लंपास

May 18, 2024 05:46 PM IST

Pune bgf jewellers daroda : पुण्यात भर दिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ३०० ते ३५० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यात भर दिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ३०० ते ३५० किलो वजनाचे दागिने लंपास केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पुण्यात भर दिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ३०० ते ३५० किलो वजनाचे दागिने लंपास केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Pune bgf jwelars daroda : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. आज भरदिवसा वानवडी हद्दीतील वाडकर मळा शेजारी असलेल्या बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. ही घटना १२ च्या सुमारास भरदिवस घडली. दरोडेखोर हे चेहेऱ्यावर मास्क लावून आले होते. त्यांनी शास्त्राचा धाक दाखवत दुकानातील तब्बल ३०० ते ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. आरोपी हे दुचाकीवरून फरार झाले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. सीसीटीव्हीत आरोपी दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

वानवडी हद्दीतील मोहम्मद वाडी रोड वारकर मळा येथील बीजेएफ ज्वेलर्स या दुकानात आज १२ च्या सुमारास ७ ते ८ दरोडेखोर मास्क घालून दुकानात शिरले. त्यांनी काही शस्त्राच्या जोरावर दुकानातील कर्मचाऱ्यांना धाक दाखवून दुकानातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने असे ३०० ते ३५० ग्रॅम वजनाचे दागिणे लंपास केले. आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांनी एका काळ्या रंगाच्या बगेत सर्व दागिने भरून पोबारा केला.

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आता नागरिक दिवसा देखील सुरक्षित राहिले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वानवडी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळांचा पंचनामा त्यांनी केला आहे. दुकानातील सिसिटीव्ही देखील तपासण्यात येत आहे. सीसीटीव्हीत दोन दरोडे खोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकान लुटले आहे. घटनास्थळी डीसीपी आर राजा, सपोआ इंगळे यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारीदेखील पोहोचले आहेत.

J P Nadda On Rss : भाजप आता सक्षम, आरएसएसची गरज नाही! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा मोठा दावा

या दुकानातून साधारण ७ अनोळखी इसमांनी मास्क लावून बीजेएफ ज्वेलर्समधून ३०० ते ४०० ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने लुटले आहे.

परिसरात दहशतीचे वातावरण 

पुण्यात भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. स्थानिक वेंपरि या घटनेमुळे असुरक्षित समजत आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. ही घटना पाळत ठेऊन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

 

WhatsApp channel
विभाग