Indapur tehsildar attack : इंदापूरमध्ये तहसीलदारांवर हल्ला, भरचौकात गाडी फोडली, मिरचीची पूड डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न-pune attack on tehsildar shrikant patil in indapur ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Indapur tehsildar attack : इंदापूरमध्ये तहसीलदारांवर हल्ला, भरचौकात गाडी फोडली, मिरचीची पूड डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न

Indapur tehsildar attack : इंदापूरमध्ये तहसीलदारांवर हल्ला, भरचौकात गाडी फोडली, मिरचीची पूड डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न

May 24, 2024 03:25 PM IST

Attack on Tehsildar in Indapur: पुण्यातील इंदापूरमध्ये तहसीलदारांवर हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

इंदापूरचे तहशीलदारवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली.
इंदापूरचे तहशीलदारवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली.

Indapur Tehsildar Attack News: पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. इंदापूर शहरातील संविधान चौकात अज्ञातांनी श्रीकांत पाटील यांची गाडी फोडली. तसेच त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

तहसीलदार यांची गाडी इंदापूर शहरातील संविधान चौकात आली असता अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. सोबतच हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती. या हल्ल्यात शासकीय गाडीची नुकसान झाल असून सुदैवाने तहशीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली.या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांवर जोरदार टीका केली आहे.

अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना- सुप्रिया सुळे

"इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे", असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध."

Whats_app_banner
विभाग