Pune ATS action : कोंढव्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा पर्दाफाश; ३७८८ सिमकार्ड जप्त! पुणे एटीएसची मोठी कारवाई-pune ats busted fraud telephone exchange in kondhwa 3788 sim card sized ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune ATS action : कोंढव्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा पर्दाफाश; ३७८८ सिमकार्ड जप्त! पुणे एटीएसची मोठी कारवाई

Pune ATS action : कोंढव्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा पर्दाफाश; ३७८८ सिमकार्ड जप्त! पुणे एटीएसची मोठी कारवाई

Aug 29, 2024 04:44 PM IST

Pune fraud telephon exchange in Kondhwa : पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकण्यात आला असून अनेक संवेदशील साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

कोंढव्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा पर्दाफाश; ३७८८ सिमकार्ड जप्त! पुणे एटीएसची मोठी कारवाई
कोंढव्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा पर्दाफाश; ३७८८ सिमकार्ड जप्त! पुणे एटीएसची मोठी कारवाई

Pune fraud telephone exchange in Kondhwa : पुण्यात येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या उत्सवात गैर प्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, आज दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील कोंढवा भागात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकत अनेक संवेधनशील साहित्य जप्त केले आहे. विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी या बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा वापर होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईत तब्बल ३ हजार ७८८ सीम कार्ड व विविध प्रकारची यंत्र जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात कोंढवा येथील मिठानगर येथे असलेल्या एम ए कॉम्प्लेक्स परिसरात हे अनधिकृत एक्सचेंज सेंटर सुरू होतं. या बाबतची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती, त्यानुसार आज सकाळी एटीएसच्या पथकाने या टेलिफोन एक्सचेंजवर धाड टाकली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३ हजार ७८८ सिम कार्ड, सात सिम बॉक्स वाय फाय आणि सिम्बॉक्स चालविण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना व लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे. या कारवाईत एका २२ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. नौशाद अहमद सिद्धी असे या तरुणाचं नाव आहे.

परदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल यंत्रणेला समजू न देण्यासाठी हे टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा दहशतवादी विरोधी पथक सध्या तपास करत असून ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे पोलीस चौकशी करत आहेत. या पूर्वी देखील कोंढवा येथून काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. हे दहशतवादी आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. यानंतर आता येथे बनावट टेलिफोन एक्सचेंज सापडल्याने खळबळ उडली आहे. या टेलिफोन एक्स्चेंजचा वापर कशासाठी होत होता याचा तपास यंत्रणा करत आहेत.

विभाग