मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune ATS Action: लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला सहारणपूर येथून अटक; अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची करायचा भरती

Pune ATS Action: लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला सहारणपूर येथून अटक; अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची करायचा भरती

Jun 13, 2022 02:47 PM IST

इनामुल असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. हा जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. या पूर्वी बुलढाण्यातील जुनैद मोहम्मद अता मोहम्मद या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Pune ATS
Pune ATS

पुणे : पुणे एटीएस पथकाला (Pune ATS Action) आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात यश मिळाले आहे. एटीएच्या पथकाने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून अटक केली आहे. (Lashkar-e-Toiba terrorist arrested from Saharanpur) त्याला आज पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. हा दहशतवादी लष्करसाठी तरुणांची भरती करायचा अशी माहिती सुत्रांनी दिली.

इनामुल असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. हा जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. या पूर्वी बुलढाण्यातील जुनैद मोहम्मद अता मोहम्मद या तरुणाला अटक करण्यात आली आहे. इनामुल हा जुनैद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. तो उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन ही कारवाई करत इनामुलला ताब्यात घेतले. इनामुल हा जुनैदप्रमाणेच तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी चिथावणी द्यायचा, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, पुण्यातून गेल्या आठवड्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या मोहमद जुनैद याला अटक करण्यात आली होती. या दहशतवाद्यांची पाळेमूळे ही जम्मू काश्मिरमध्ये असल्याने महाराष्ट्राचे एटीएसचे पथक हे जम्मू काश्मिरला गेले होते. या पथकाला मोठे यश मिळाले असून लष्कर-ए-तोयबासाठी भरती करणा-या हस्तकाला अटक केली. लष्कर-ए-तोेयबाचा सदस्य असलेला हा दहशतवादी सुतारकाम करत होता. जुनैदच्या माध्यमातून तो संघटनेत तरुणांची भरती करत होता. तसेच लष्करच्या परदेशात असलेल्या संघटनांशीही याचे संबंध आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

 

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर