मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News: पुणेकरांना दिलासा! शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार; पेट्रोल डिझेल असोसिएशनचा निर्णय

Pune News: पुणेकरांना दिलासा! शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार; पेट्रोल डिझेल असोसिएशनचा निर्णय

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 02, 2024 09:39 AM IST

Pune petrol distribution : हिट अँड रन कायद्या विरोधात ट्रान्सपोर्ट युनियनने संप घोषित केला असून यामुळे इंधन टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, पुण्यात पेट्रोल पंप सुरु राहणार असल्याचे पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

Pune petrol distribution
Pune petrol distribution (PTI)

Pune Petrol Diesel Dealers Association : हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनने संप घोषित केला आहे. यामुळे राज्यात इंधन टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तीन दिवस यामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पुण्यात काल पेट्रोल भरण्यासाठी झुंबड उडाली होती. पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नसल्याहे असोसिएशन जाहीर केले असून यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.

राम मंदिरात स्थापित होणारी मूर्ती ठरली; ‘या’ मूर्तिकाराने साकारले प्रभू रामाचे मनमोहक रूप

केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणी नवा वाहन कायदा आणला आहे. अपघात करून पळून जाणाऱ्या वाहन चालकांना ७ लाख रुपयांचा दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याला ट्रान्सपोर्ट असोसिएशनने विरोध केला आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे राज्यात इंधन टंचाई भासण्याची शक्यता आहे. पुण्यात देखील पेट्रोल टंचाईच्या भीतीने पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. राज्यातील अनेक शहरांमध्ये हा संप पाळण्यात येत आहे.

Maharashtra weather update : अरबी समुद्रात कमी दाबचा पट्टा! राज्यातील 'या' भागावर पावसाचे सावट; थंडी वाढणार

वाहनचालक आक्रमक होत त्यांनी रस्तावरच वाहने उभी केली आहे. दरम्यान, पुण्यात देखील इंधन टंचाई भासणार अशी अफवा पसरली होती. यामुळे पेट्रोल पांपावर मोठा गोंधळ उडाला होता. यामुळे पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशनने स्पष्टीकरण दिले आहे. या सपांत सहभागी न होण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला म्हणाले, आम्ही या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व पेट्रोल पंप सुरु राहतील.

असोसिएशनच्या या निर्णयामुळे पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील देखील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याने पुणेकरांना संपापासून दिलासा मिळणार आहे.

या संपात भारत पेट्रोलियम , हिंदुस्थान पेट्रेलियम , इंडियन ऑईल या इंधन कंपन्यांसह इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले असल्याने इंधन टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिमाण राज्यातील बससेवेवर देखील झाला होता. इंधन नसल्याने अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

WhatsApp channel

विभाग