मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : पुणे तिथे काय उणे! सर्वात छोटे अन् दाटीवाटीचे रस्ते असलेल्या शहरात जगात सातवा क्रमांक

Pune News : पुणे तिथे काय उणे! सर्वात छोटे अन् दाटीवाटीचे रस्ते असलेल्या शहरात जगात सातवा क्रमांक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 05, 2024 11:32 AM IST

Pune among top 10 world cities with most congested roads : ट्राफिक, गर्दी आणि सर्वात छोटे रस्ते आणि दाटीवाटीचे शहर म्हणून आत पुण्याचा जगात सातवा क्रमांक लागतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवलावरून ही बाब उघड झाली आहे. पुण्यापाठोपाठ बंगळुरूचा देखील सहावा क्रमांक या यादीत आहे.

Pune traffic change
Pune traffic change

Pune among top 10 world cities with most congested roads : पुणे तेथे काय उणे असे नेहमीच म्हटल्या जाते. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुण्याची सांस्कृतिक राजधानी आणि ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असतांना आता पुण्याला पुन्हा नवी ओळख निर्माण झाली आहे. पुण्याने जगातील सर्वाधिक दाटीवाटीचे आणि छोटे रस्ते असल्याच्या शहऱ्यांच्या यादीत सातवा क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत बंगळुरू शहराचा ६ वा क्रमांक आहे.

टॉम टॉम अहवाल २०२३ प्रसिद्ध झाला असून यात ही माहिती उघड झाली आहे. पुण्याने जगातील पहिल्या सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी, पुण्यात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी वेळ हा २७ मिनिटे आणि ५० सेकंद लागत होता. यात आत वाढ झाली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली, गर्दीत ४४ व्या क्रमांकावर आहे, दिल्लीत १० किमीचे अंतर कापण्यासाठी सुमारे २१ मिनिटे आणि ४० सेकंद लागतात अंतर तर मुंबईत हेच अंतर कापण्यासाठी सरासरी २१ मिनिटे आणि २० सेकंदांचा कालावधी लागत असल्याने प्रवासाच्या वेळेसह मुंबई ५४ व्या क्रमांकावर आहे.

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे कुख्यात गुंडासोबत; फोटो शेअर करून संजय राऊत म्हणाले…

टॉमटॉम इंडेक्स या डच बहुराष्ट्रीय लोकेशन टेक्नॉलॉजीच्या अहवालानुसार २०२३ मध्ये पुणे आणि बंगळुरू जगातील सर्वाधिक गर्दी असलेल्या प्रमुख १० शहरांच्या यादीत होते. या यादीत जागतिक स्तरावर बेंगळुरू सहाव्या तर पुणे सातव्या, नवी दिल्ली ४४व्या आणि मुंबई ५४व्या क्रमांकावर आहे.

२०२२ मध्ये, बेंगळुरूमध्ये १० किमी अंतर कापण्यासाठी २९ मिनिटे आणि १० सेकंद लागत होती. तर नवी दिल्ली येथे २२ मिनिटे आणि १० सेकंदांसह ३४ व्या स्थानावर, तर मुंबई ही ४७ व्या क्रमांकावर होती.

Vasai Crime news : धक्कादायक! वसईत गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू

२०२३ च्या टॉमटॉम अहवालानुसार, पुण्यातील एका प्रवाशाने गर्दीच्या वेळी सरासरी २५६ तास ड्रायव्हिंग केले. वाहतूक कोंडीमुळे तयाचे तब्बल १२८ तास वाया गेले. यामुळे अंदाजे १ हजार ७ किलो कार्बनचे उत्सर्जंन झाले झाले. त्यापैकी १६५ किलो हा पुण्यातील गर्दीमुळे उत्सर्जित झाला.

नवी दिल्लीतील प्रवाशांनी १९१ तास, मुंबई १९८ तास आणि बंगळुरू २५७ तास पीक अवर्समध्ये ड्रायव्हिंग केले. यात त्यांनी अनुक्रमे ८१, ९२ आणि १३२ तास वाहतुकी कोंडीत गमावले.

५५ देशांमधील ३८७ शहरांमध्ये केलेल्या या अभ्यासात लंडन हे सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून आढळले. १० मिनिटांच्या प्रवासाठी ३७ मिनिटे आणि २० सेकंद लागत होते. लंडननंतर डब्लिन येथे १० किमी अंतर कापण्यासाठी २९ मिनिटे लागत. तर टोरंटो येथे १० किमी अंतर कापण्यासाठी २९ मिनिट ३० सेकंद लागतात.

देशातील मेट्रो शहरातील वाहतुकीचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासूंन ऐरिणीवर आला आहे. या शहरांमध्ये सुरू असलेली विकासकामे आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे वाहतुक कोंडीत भर पडली आहे. यावर उपाय म्हणून तज्ज्ञांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि पार्किंगसारख्या व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी करण्याचे सुचवले.

टॉमटॉमच्या अहवालात पुण्यात गर्दीच्या वेळी सरासरी वेगाची देखील नोंद घेण्यात आली आहे. २०२३ मध्ये पुण्यात गर्दीच्या वेळी वाहतुकीचा पुढे जाण्याचा वेग हा १८ किमी प्रतीतास होता. रणजित गाडगीळ या वाहतूक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या एनजीओने रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करणे आणि प्रभावी धोरणे राबविण्यावर भर दिला होता.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार २०२३ मधील सर्वाधिक गर्दीची १० शहरे

१ . लंडन

२ . डब्लिन

३. टोरोंटो

४. मिलान

५. लिमा

६. बेंगळुरू

७. पुणे

८. बुखारेस्ट

९. मनिला

१०. ब्रुसेल्स

WhatsApp channel

विभाग