Amit Shah: महाविकास आघाडी म्हणजे 'औरंगजेब फॅन क्लब' आणि उद्धव ठाकरे त्यांचे नेते; पुण्यात अमित शाह कडाडले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Shah: महाविकास आघाडी म्हणजे 'औरंगजेब फॅन क्लब' आणि उद्धव ठाकरे त्यांचे नेते; पुण्यात अमित शाह कडाडले!

Amit Shah: महाविकास आघाडी म्हणजे 'औरंगजेब फॅन क्लब' आणि उद्धव ठाकरे त्यांचे नेते; पुण्यात अमित शाह कडाडले!

Jul 21, 2024 08:08 PM IST

Amit Shah on Maha Vikas Aghadi and Uddhav Thackeray: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

अमित शाहांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
अमित शाहांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Pune News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.अमित शाहांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीचे वर्णन औरंगजेब फॅन क्लब असे केले. तर, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हेतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे किंगपीन असल्याचे त्यांनी म्हटले. याचबरोबत महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

पुण्यातील भाजपाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, 'उद्धव ठाकरे हे कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या लोकांसोबत गेले आहेत, याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर गेले आहेत. पीएफआय संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांचा मांडीला मांडी लावून बसले आहेत. संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना साथ देत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे. तर, उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, अशी अमित शाहांनी सडकून टीका केली.'

शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे किंगपीन

मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना अमित शाहांनी शरद पवारांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार येते तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळाले. पण जेव्हाही शरद पवारांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण गायब होते. शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे किंगपीन आहेत, अशीही टीका अमित शाहांनी केली.

विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह म्हणाले...

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील तीन ते चार महिने विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून रणनीती आखली जात आहे.यातच अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. यावेळी पण भाजपाच्या नेत्वृत्वाखाली महायुती पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने १५५ ते १६० जागांवर लढण्याची इच्छा व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत त्यापेक्षा कमी जागा लढणार नाही, असा भाजप नेत्यांचा निर्धार आहे. मात्र, यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महायुतीमधील शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त १२८ ते १३३ जागा येण्याची शक्यता आहे. उर्वरित घटकपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील. मात्र, यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादी गटाचे प्रत्येकी ८०- ते १०० जागा लढण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर