मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे-अहमदनगर हायवेवर भीषण अपघात, ट्रकला कार धडकून ५ जणांचा जागीच मृत्यू
पुणे - अहमदनगर मार्गावर भीषण अपघात
पुणे - अहमदनगर मार्गावर भीषण अपघात

पुणे-अहमदनगर हायवेवर भीषण अपघात, ट्रकला कार धडकून ५ जणांचा जागीच मृत्यू

17 August 2022, 8:41 ISTSuraj Sadashiv Yadav

Pune Ahmednagar Accident: अचानक ट्रक आडवा आल्याने कारची ट्रकला जोरात धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

Pune Ahmednagar Accident: पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघाताची घटना आज घडली आहे. अचानक आडव्या आलेल्या ट्रकला कारची धडक बसून झालेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण जखमी असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पुण्यातील रांजणगाव एमआयडीसीतल्या एलजी कंपनीसमोर हा अपघात झाला. कारमधील सर्वजण पनवेलला निघाले होते असे समजते.

ट्रेंडिंग न्यूज

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कारमधील प्रवाशी पुण्याहून पनवेलकडे निघाले होते. तेव्हा पुणे-अहमदनगर मार्गावर एक ट्रक चुकीच्या बाजूने आला. तसंच ट्रक अचानक रस्त्यात आडवा आल्याने कारची ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील पाच जणांचा जागीत मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महामार्गावर लेनच्या नियमांचे पालन होत नसल्याचा मुद्दा चार दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायकम मेटे यांच्या अपघाती निधनानंतर चर्चेत आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा रस्ते अपघाताबद्दल बोलताना म्हणाले होते की,"वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. अपघातमुक्त भारत करणं हीच विनायक मेटे यांना श्रद्धांजली ठरेल." आताही कार अपघात ट्रक अचानक आडवा आल्यानं झाल्याचं म्हटलं जातं आहे.